राष्ट्रवादीचा धक्का ; भाजप संलग्न अपक्ष नगरसेवकांच्या गटनेत्याला घेतले पक्षात

कैलास बारणे राष्ट्रवादीत आल्यानेचिंचवड आणि थेरगाव भागात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.
Sarkarnama - 2021-09-16T133526.136.jpg
Sarkarnama - 2021-09-16T133526.136.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation) सत्ताधारी भाजपची संलग्न अपक्ष नगरसेवकांच्या आघाडीचे गटनेते कैलास बारणे  (Kailash Barne) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गुरुवारी (ता.१६) सकाळी प्रवेश केला. भल्या सकाळी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने इकडे पिंपरी-चिंचवड भाजप खडबडून जागी झाली. यासाठी बारणे व राष्ट्रवादीचे शहरातील नेते पहाटेच मुंबईला रवाना झाले होते. या टर्ममधील नगरसेवकाचा राष्ट्रवादीतील हा पहिला प्रवेश आहे. दिवाळीनंतर असे अनेक फटाके फुटतील,असे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले.

शहराचे कारभारी आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघातील पहिला विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. त्यानंतर याच मतदारसंघातील नगरसेविका माया बारणे या ही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यांचे पती, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी याच महिन्यात (ता.९) अजितदादांच्या उपस्थितीतच हातात घड्याळ बांधले.तर, गेल्या महिन्यात आमदार जगताप यांच्या  पिंपळे गुरव या बालेकिल्यातील नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती, माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी अजितदादांच्याच उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे चिंचवडमधील आजी,माजी नगरसेवकांची राष्ट्रवादीतील प्रवेशाची ही हॅटट्रिक झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील या बड्या नेत्याला व्हायचं होत अभिनेता...
या प्रवेशापूर्वी बारणे यांनी अजितदादांची पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतरही ते त्यांना भेटले होते. आज त्यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे व इतरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. थेरगाव भागातच माया व संतोष बारणे यांचेही मोठे प्रस्थ आहे. ते तेथून तीनदा निवडून आले आहेत. त्याच भागातील कैलास बारणे हे ही संतोष बारणेनंतर राष्ट्रवादीत आल्याने भाजप आमदार असलेल्या चिंचवडमध्ये आणि थेरगाव भागात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निवासस्थान थेरगावमध्येच आहे.

पेंग्वीनसाठी पंधरा कोटी ? कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही उधळपट्टी 
अजितदादांची कामाची पद्धत आवडल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे कैलास बारणे यांनी मुंबईहून सरकारनामाला सांगितले.अपक्ष आघाडीतील इतर चार नगरसेवकही तुमचा मार्ग चोखाळणार का,असे विचारले असता त्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या चार अपक्ष नगरसेवकांपैकी नीता पाडाळे, नवनाथ जगताप आणि झामाबाई बारणे या अगोदर राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची घरवापसी होण्याची चर्चा कैलास बारणेंच्या प्रवेशानंतर लगेचच सुरु झाली आहे.तर, शहराचे दुसरे कारभारी भोसरीचे भाजपचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हे सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची अगोदरच चर्चा आहे. त्यांनीही अजितदादांची भेट घेतलेली आहे. तसेच १५ ऑगस्टला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग्जवर भाजपऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे होती. त्यातूनही याबाबत नेमका संदेश गेलेला आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com