फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली ; शुक्लांचा गौप्यस्फोट
0Sarkarnama_20Banner_20_202021_03_23T131917.808.jpg

फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली ; शुक्लांचा गौप्यस्फोट

रश्मी शुक्ला यांची बाजूज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मांडली.

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला Rashmi Shukla वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court सुनावणी झाली. या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत. रश्मी शुक्ला यांची बाजू ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मांडली. 

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयु्क्त रश्मी शुल्का यांची बाजू मांडताना जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितलं की, फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली होती. पोलिस दलातील बदल्यांमध्ये होणारे भ्रष्टाचार खरे आहेत का हे तपासण्यासाठी ही परवानगी देण्यात आली होती. 

शिवसेनेचं अखेर ठरलं! स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा!
न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठासमोर रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवर आजची सुनावणी झाली. जेठमलानी यांनी रश्मी शुक्ला यांची बाजू मांडत असताना कोर्टाला सांगितलं की रश्मी शुक्ला यांनी फक्त आदेशाचं पालन केले आहे. महासंचालकांच्या निर्देशानुसार त्यांनी त्याचे पालन केले आहे. 

भारतीय टेलिग्राफ अधिनियमांतर्गत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची देखील परवानगी घेतली होती. ही परवानगी 17 जुलै 2020 ते 29 जुलै 2020 पर्यंत दिली होती. सीताराम कुंटे यांनी 25 मार्च 2021 रोजी सरकारला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये याची पुष्टी केली. परवानगी घेताना त्यांची दिशाभूल केली गेली, असे जेठमलानी यांनी सांगितले.  

या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच ऑगस्ट रोजी होणार आहे.  या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in