मोदी सर्वाधिक 'लोकप्रिय नेता' ; Twitter वर फॉलोअर्सची संख्या 7 कोटींच्या पार

मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात.
4Narendra_20Modi_20Sakal_20Times_201_0.jpg
4Narendra_20Modi_20Sakal_20Times_201_0.jpg

नवी दिल्ली: सोशल मीडियावर पंतप्रधान Prime Minister नरेंद्र मोदी Narendra Modi यांची लोकप्रियता वाढत आहे.  नरेंद्र मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात. टि्वटरवर Twitter त्यांचे सात कोटी फॉलोअर्स झाले आहेत. 

सोशल मीडियावर फॉलो केलेल्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. तर जगातील नेत्यांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर फॉलोअर्स असणाऱ्यांत मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. केंद्र सरकारनं केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार 2018 मध्ये नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिल्या तीनमध्ये होते.

शिवसेनेचं अखेर ठरलं! स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा!
मोदी (PM Modi) जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अव्वल होते. ट्रम्प यांना 88.7 मिलियन म्हणजेच 8.87 कोटी लोकांनी फॉलो केलं होतं. मात्र त्यांचं अकाऊंट आता बंद झालं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या पर्सनल अकाऊंटला 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख लोक फॉलो करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होते. नरेंद्र मोदींना 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख लोक फॉलो करत होते. आता फॉलोअर्सची ही संख्या वाढून 70 मिलियन म्हणजे 7 कोटी झाली आहे. काँग्रेसचे नेते, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांचे 30.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे ट्विटरवर 18.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com