शिवसेनेचं अखेर ठरलं! स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा!

शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
शिवसेनेचं अखेर ठरलं! स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा!
2sanjay_20raut_16.jpg

मुंबई :  येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुकांबाबत बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ( election commission ) बैठक घेतली. 

गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या विधानसभांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा मे २०२२ मध्ये संपत आहे. यामुळे पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकां पुढच्या वर्षी एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. विविध पक्षानी यासाठी तयारी केली आहे. शिवसेना  Shiv Sena उत्तरप्रदेशात स्वतंत्र्य लढेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत  Sanjay Raut यांनी आज सांगितले. Shiv Sena will contest Uttar Pradesh Assembly elections independently

संजय राऊत म्हणाले, ''उत्तर प्रदेशात  २०२२ च्या  विधानसभा निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढणार. आमची जेवढी ताकद आहे, त्या ताकदीनं आम्ही लढू. मात्र, अखिलेश  यादव  यांच्या समाजवादी  पक्षाशी आघाडी करणार नाही. समाजववादी  पक्ष आणि  राष्ट्रवादी काँग्रेस उत्तरप्रदेशात निवडणूक लढवताहेत. उत्तर प्रदेशातील नव्या आघाडीला  शुभेच्छा. पण शिवसेना मात्र  स्वतंत्र  लढणार.'' 

राऊत म्हणाले, ''तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही त्याचे संबंध चांगले आहेत. ममतांचं म्हणणं आहे की, आधी एकत्र यावं... नेता कोण असावं हे नंतर ठरवता येईल,''
 
''ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहिल या संदर्भात पावलं टाकणं गरजेचं आहे. केंद्र सरकार गोंधळ निर्माण करीत आहेत. बॅंका बुडवणारे कोण आहेत ते पाहा. बॅंका बुडवण्यामागे कोणाची प्रेरणा आहे ते पहावं लागेल. मुंबईत आम्ही अनुभव घेतलाय,'' असा टोला राऊत यांनी भाजप नेत्याचे नाव न घेता लगावला. 
  
''या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही. केंद्र सरकारला लोकशाही संसदीय प्रणालीवर विश्वास नाही. पेगसिसच्या चर्चवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनीनी संसदेत उपस्थित राहावं. मोदी- शाह  या चर्चेला ३ तास का देऊ शकत नाही,'' असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. 
Edited by : Mangesh Mahale 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in