राज्यपालांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात फक्त आशिष शेलारच का?

राज्यपालांनी फक्त भाजपच्याच नेत्यांना निमंत्रण दिले, या प्रश्नाला फडणवीसयांनी उत्तर दिले आहेत.
1Sarkarnama_20Banner_20_289_29_0.png
1Sarkarnama_20Banner_20_289_29_0.png

कराड :  मुसळधार पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने नागरिकांचे जीव गेले, अनेक गाव दरडीखाली गेली. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी कराड मध्ये संवाद साधला. यावेळी फडणवीस Devendra Fadnavis यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.  

राज्यपाल भगतसिंग कोशियारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाडमध्ये जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि तेथील नागरिकांना दिलासा दिला. मात्र या दौऱ्यात भाजपचे आशिष शेलार हेच राजकीय नेते सहभागी झाली होते. राज्यपालांनी फक्त भाजपच्याच नेत्यांना निमंत्रण काल दिले, या प्रश्नाला फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उत्तर दिले आहेत. 

महापूरानंतर आता चिखलाचा महापुरात ग्रामस्थांनी धरली गावाची वाट!
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांनी कोकण दौऱ्यावर महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्ष प्रतोद यांना आमंत्रित केले होते पण ते गेले नाही. भाजपचे नेते आशिष शेलार केवळ दोऱ्यावर गेले त्याला काय करणार असे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.  

''राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या महाड पूरस्थिती दोऱ्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या पक्ष प्रतोद यांना राज्यपाल यांनी पाहणी दोऱ्यासाठी पाचारण केले होते. मात्र यापैकी कोणीही गेले नाही. भाजप आमदार आशिष शेलार गेले आणि तेच नजरेत आले,'' असे फडणवीस म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फोन आला. यामध्ये राष्ट्रपती यांनी राज्यपाल यांच्याकडून पूरस्थितीची माहिती घेतली. त्यांनतर राष्ट्रपती यांच्या आदेशानंतर राज्यपाल यांनी दौरा केला, असेही फडणवीस म्हणाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पहाडी भागातील असल्याने त्यांनी कोकणातील नागरिकांची या पाहणी दौऱ्यात मने जिंकून घेतली आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com