महापूरानंतर आता चिखलाच्या महापूरात ग्रामस्थांनी धरली गावाची वाट! - Villagers are returning home in the mud flood-mm76  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

महापूरानंतर आता चिखलाच्या महापूरात ग्रामस्थांनी धरली गावाची वाट!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 जुलै 2021

कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे

सांगली : गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने गावंच्या गावं पाण्याखाली गेली, यामुळे हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर शेकडो निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. आता अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरत आहे. मात्र या महापूरानंतर आता ग्रामस्थ चिखलाच्या महापूरात  mud flood वाट शोधत घराकडे परत जात आहेत. 

सांगली Sangli येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे . ती आणखी कमी होत आहे. सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील Jayant Patil यांनी याबाबत टि्वट करुन ही माहिती दिली आहे. नागरिकांनी काळजी करु नये, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. 

परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता 
पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल . त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३००००  विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे. सांगली येथे कृष्णाची पातळी काही प्रमाणात वाढेल परंतु घाबण्याचे कारण नाही, मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे.नागरिकांनी काळजी करू नये, असे टि्वट जयंत पाटील यांनी केलं आहे. 

सांगली जिल्ह्यात पाण्याच्या महापुरानंतर आता चिखलाचा महापूर आला आहे. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे.. या पुरामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तर काही ग्रामीण भागात घर सुद्धा पडली आहेत. अनेकांचं संसार उघड्यावर पडले आहेत. कोटयवधी रुपयाचं नुकसान या पुरामुळे झाले आहे.. 

मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावाला दर वर्षी पुराचा फटका बसतो. यंदा ही गावाला पुराचा फटका बसला आहे. गावाला चारी बाजूने पुराणे वेढले होते. अनेक घराची पडझड सुद्धा झाली आहे.. ग्रामस्थ पुरामुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पूर ओसरू लागला आहे. ग्रामस्थ गावाकडची वाट धरत आहेत. मात्र गावात गेल्यावर सर्वत्र चिखलाच साम्राज्य दिसून आले. गुडघ्या एवढा चिखल गावात आणि घरामध्ये साचून आहेत. त्यामुळे पुराच्या फटक्या नंतर चिखलाचा महापूर या गावात आला आहे.. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख