परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता 
3233Sarkarnama_20Banner_20_202021_05_03T170654.906.jpg

परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता 

पदाचा गैर वापर करून परमबीर सिंग यांनी गुन्हा नोंदवल्याचा आरोप तक्रारदाराने केली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त Mumbai Police परमबीर सिंग Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पदाचा गैर वापर करून परमबीर सिंग यांनी गुन्हा नोंदवल्याचा आरोप  तक्रारदाराने केली आहे. 

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संबंधीत दोन गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची SIT ची पहिली बैठक नुकतीच झाली.  उपायुक्त निमीत गोयल हे या एसआयटीचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी या एसआयटीमधील सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांच्या जबाबदा-या वाटून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली नितीन गडकरींची भेट
या एसआयटीमध्ये विविध विभागातील तज्ज्ञ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पश्चिम सायबर विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल गायकवाड आहेत. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांबाबत ते तज्ज्ञ असल्याचे बोलेले जाते. आर्थिक गुन्हे शाखेतील प्रितम परब हे आर्थिक बाबींचा तपास करणार आहेत. याशिवाय खंडणी विरोधी पथकातील सचिन पुराणिक, आझाद मैदान पोलिस ठाण्यातील विनय घोरपडे व गुन्हे शाखा कक्ष-5 चे महेंद्र पाटील हे अधिकारी तपास व कागदपत्रे तयार करण्यात तज्ज्ञ आहेत. 

या सर्वांवर देवनार विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त एम.एम. मुजावर हे प्रमुख तपासी अधिकारी असणार असल्याची माहिती सूञांनी दिली. अशातच दुसरीकडे परमबीर सिंग यांच्या वर उद्या ठाणे नगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या परमबीर हे अद्यातवासात आहे. ते चंदीगढ येथे गेल्याची चर्चा होती. माञ त्यांचाशी फोनवरही संपर्क होत नाही 

परमबीर सिंग यांच्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुखांवर हे आरोप केले. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेमार्फत देशमुखांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात म्हटलं आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ईडीकडूनही मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in