आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल 

माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बलादी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल 
2MLA_Prashant_Thakur.jpg

नवी मुंबई  : नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आठशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही उरण पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे.   

दि. बा. पाटील यांचे जन्म गाव असलेल्या जासई येथे सभेचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलन करणाऱ्या आठशे जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखले केले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बलादी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ भगत, पनवेल महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर यांचा यात समावेश आहे.  

आमच्या हातात खाऊचा डबा दिलाय...पण तो डबा रिकामाच 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी  काल जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रकल्प ग्रस्त, भूमिपुत्र या मशाल मोर्चात सहभागी झाले होते. पुढील टप्प्यात 16 तारखेला विमानतळाचे काम बंद आंदोलन करणार त्याचबरोबर दिल्लीत सुद्धा नेते मंडळींच्या भेट घेणार आहेत.

नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून हा मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

संजय जाधव  म्हणतात, ''मी आंबा म्हटलं की ते चिंच म्हणतात'' 
नवी दिल्ली : परभणीचे शिवसेना  ShivSena खासदार संजय जाधव Sanjay Jadhav यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर असलेली नाराजी शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केली. यावरुन सध्या राजकारण चांगलेच तापलं आहे. खासदार जाधव यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर तोफ डागल्यामुळे महाविकास आघाडीत घटक पक्षाबाबतच नाराजी व्यक्त होत आहे. खासदार जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope, खासदार फौजिया खान यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.