संजय जाधव म्हणतात, ''मी आंबा म्हटलं की ते चिंच म्हणतात'' 

मी काही भूमिका घेतली तर काही जणांना पोटसूळ उठते. ही शोकांतिका आहे.
संजय जाधव म्हणतात, ''मी आंबा म्हटलं की ते चिंच म्हणतात'' 
3Sarkarnama_20Banner_20_202021_08_09T164107.639.jpg

नवी दिल्ली : परभणीचे शिवसेना  ShivSena खासदार संजय जाधव Sanjay Jadhav यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर असलेली नाराजी शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केली. यावरुन सध्या राजकारण चांगलेच तापलं आहे. खासदार जाधव यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर तोफ डागल्यामुळे महाविकास आघाडीत घटक पक्षाबाबतच नाराजी व्यक्त होत आहे. खासदार जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope, खासदार फौजिया खान यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

संजय जाधव म्हणाले, ''मी काही भूमिका घेतली तर काही जणांना पोटसूळ उठते. ही शोकांतिका आहे. लोकांना असं झाले आहे की मी एक म्हटलं की काही जण दुसरंच काहीतरी म्हणतात, मी आंबा म्हटलं की ते चिंच म्हणणार, मी चिंच म्हटलं की ते आंबा म्हणणार अशी त्यांची वृत्ती झाली आहे.'' 

आमच्या हातात खाऊचा डबा दिलाय...पण तो डबा रिकामाच 
राष्ट्रवादीबाबत आपली खदखद आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना जाधव म्हणाले की, माझी कोणाबाबतही खदखद नाही. माझ्या पक्षाचाच मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस करणं काही गैर नाही. नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे मी स्वागत केलं आहे. पण बंडू जाधव यांनी काही भूमिका घेतली काही जणांच्या पोटसूळ उठते. ही शोकांतिका आहे. मी सामान्य कार्यक्रर्ता आहे. कर्तव्य पाळत असताना मी कोणाचाही बाटलेला नाही. शिवसेनेच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. आमच्या एका कार्यकर्त्याचे रेशनिंगचे दुकान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी छगन भूजबळ यांच्या माध्यमातून बंद केले. त्यावरुन मी भूमिका मांडली. याचा असा अर्थ मी भूजबळ साहेबांच्या विरोधात आहे, असा नाही. ते आमचे नेते आहे. त्यांच्याबाबत मी आदरपूर्वकच वागेल. त्यांना उद्देशून मी बोलावं, अशी माझी भावना नव्हती.

''आयएएस दर्जाचा माणूस जिल्हाधिकारी म्हणून द्यावा, अशी शिफारस मी केली होती. शिफारस करणं हा जर गुन्हा असेल तर तो मी केला आहे. लोकांनी भासवले की मी त्यांना विरोध करतो, महिलांना विरोध आहे. रात्री दहा वाजता दिल्लीतून खासदार फौजिया खान पत्रकारांना सांगतात की, ''मी पवार साहेबांना सांगितले आहे.'' तुम्ही पवार साहेबांना सांगितले ते ठिक आहे. पण हे बाहेर कशाला सांगतात.''  

मला यामुळे काहीही त्रास होणार नाही.  माझ्या काय मोठ्या शैक्षणिक संस्था आहे, का माझा दोन नंबरचा व्यवसाय आहे.  मी एखाद्या अडचणीत आहे असे उदाहरण सांगावं त्या दिवशी मी राजकारणाचा त्याग करेल. माझा अध्यात्मावर विश्वास आहे. वारकरी संपदायातील मी एक वारकरी आहे. चुकीचं काम आयुष्यात कधीही केलं नाही करणार नाही, असे संजय जाधव म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला जुळवून घेण्यास अवघड होते का, या प्रश्नाला उत्तर देताना जाधव म्हणाले की, मागे भाजप-शिवसेनेचा युतीचं सरकार होतं. त्यावेळी भाजप आमच्यावर कुरकोडी करीतच होते. त्या अनुभवातून शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना त्रास झाला. यातून पक्षनेतृत्वाने जो निर्णय घेतला. त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. आमची बांधिलकी आहे. शिवसेना मेळाव्यात माझ्या विधानामुळे काहीचे मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी ताकाला जाऊन गाडगं लपविणारा नाही, जे पोट्यात आहे ते ओठात आहे, अन् जे ओठावर आहे तेच पोटात आहे. बोलायचे एक आणि करायचे एक असे मी कधीही करीत नाही. महाविकास आघाडीला माझ्या विधानामुळे हानी झाली असेल तर असेल तर मी क्षमा मागतो,'' असे जाधव म्हणाले.   
Edited by : Mangesh Mahale
 

Related Stories

No stories found.