मोठी बातमी : 11 एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट –ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार होती.
mpsc.jpg
mpsc.jpg

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वपक्षीय मताने घेण्यात आला. परीक्षे संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकित व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट –ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार होती. मात्र, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णंसख्येची धास्ती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी घेतली आहे. 

एमपीएससीच्या परीक्षेला बसलेले अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालक देखील पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेला उपस्थित राहण्याविषयीची अडचण आहेत. गेल्या आठवड्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्गाचे कारण देत 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने 14 मार्चची परीक्षा 21 मार्चला घेण्याचे आणि त्यासोबतच 11 एप्रिलला होणारी परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होईल, असे जाहीर केले होते. आता राज्यात कोरोना संसर्ग वाढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात गुरुवारी 56 हजार 286 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर 36 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 49 हजार 757 रुग्ण  कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 21 हजार 317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.

सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येने लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गुरुवारच्या २४ तासांत १ लाख ३१ हजार ८७८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ८०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात सध्या ९ लाख ७४ हजार २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com