महिला अतिरिक्त आयुक्तांवर कोयत्याने हल्ला ; कडक कारवाईचे आदेश

एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या तब्येतीची विचारपूस केली.
Sarkarnama (39).jpg
Sarkarnama (39).jpg

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे  Kalpita Pimple काल संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्याना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

काल रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या तब्येतीची विचारपूस केली.  त्यांचा उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेतर्फे केला जाईल, असे सांगितले.  ''अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.  कल्पिता पिंपळे यांची त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर शिंदे बोलत होते.  

मोदी विरुद्ध नितीश?  विरोधकांकडून सर्वमान्यता मिळेल!
एकनाथ शिंदे म्हणाले, ''अधिकाऱ्यांवर त्यातही महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची अशी ही शहरातील पहिलीच घटना आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे.  अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.'' 

सरकारचा इंग्रजी शाळांना दणका ; नवा आदेश 
मुंबई : ‘सीबीएसई’CBSE, ‘आयसीएसई’, ‘आयबी’, ‘केंब्रिज’ Cambridge आणि इतर मंडळांच्या इंग्रजी माध्यमांच्या English Schoolशाळांमध्ये मराठी (द्वितीय भाषा) विषयाबाबत राज्य सरकारने गेल्या वर्षी आदेश काढला होता; परंतु त्या आदेशात ‘सक्तीचा’ हा शब्द नसल्याने काही शाळांनी द्वितीय भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी भाषा शिकवण्याचा सरकारचा निर्णय योग्यरीत्या राबवला जात नसल्याचे सरकारला आढळले. अखेर सरकारने सोमवारी मराठी Marathi (द्वितीय भाषा) विषय सक्तीचा करण्याचा नवा शासन निर्णय जारी केला.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com