नोटीस मिळताच ७२ तासांत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागा 

आपलीप्रतिमा मलिन होतआहे.
नोटीस मिळताच ७२ तासांत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागा 
Anil Parab issued Notice of Defamation Claim to Kirit Somaiya

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांच्या विभागातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले जात आहेत. या बिनबुडाच्या आरोपांमुळे जनमानसांत आपली प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे परब यांनी किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला आहे. (Anil Parab issued Notice of Defamation Claim to Kirit Somaiya)

परिवहन विभागातील बदल्या तसेच पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने या विभागाचे मंत्री अनिल परब यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दापोली येथील अनाधिकृत रिसॉर्टसंदर्भातही सोमय्या यांनी ट्विटरवरून परब यांच्याविरोधात पोस्ट केल्या होत्या. 

भाजप नेते सोमय्यांच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे आपली जनमानसांत प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा परब यांनी केला आहे. त्यामुळे परब यांनी त्यांच्या वकिलामार्फत सोमय्या यांना तब्बल १०० कोटी रुपये मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये वरील सर्व आरोपांचा उल्लेख केला असल्‍याचे परब यांचे वकिल सुषमा सिंग यांनी सांगितले.

सोमय्या यांनी भविष्यात असे आरोप करू नयेत, आरोपासंदर्भातील जुने ट्विट डिलीट करावे, माफीनामा मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या भाषेतील किमान दोन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करावा, नोटीस मिळाल्याच्या ७२ तासांत नोटिशीतील मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशाराही परिवहन मंत्री परब यांच्या वकिल सुषमा सिंग यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in