धनगर समाजाचा वजनदार नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

हा राष्ट्रवादीसाठी लाभदायी ठरणार आहे.
Dhangar Samaj leader Suresh Kamble will join NCP
Dhangar Samaj leader Suresh Kamble will join NCP

भूम : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांना टक्कर देणारे जय मल्हार आर्मीचे प्रमुख तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील धनगर समाजाचे वजनदार नेते सुरेश कांबळे हे लवकरच स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  सुरेश कांबळे यांनी ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांचा हा निर्णय वंचित आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, विधान परिषदेच्या १२ जागांपैकी एक जागेवर नांदेडमधील ‘वंचित’चे नेते यशपाल भिंगे यांचे नाव राष्ट्रवादीने सुचविले आहे. त्यामुळे तेही राष्ट्रवादीच्या जवळ गेल्याचे मानले जात आहे. (Dhangar Samaj leader Suresh Kamble will join NCP)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भूम-परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कांबळे यांच्यासमवेत त्यांचे समर्थक, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्यकर्तेही हाती घड्याळ बांधणार आहेत. याबाबतचा निर्णय कांबळे यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन घेतला आहे. 

कांबळे यांच्या प्रवेशामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळकटी येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पद्यसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काहींशी कमजोर झाली आहे. ती कसर भरून काढण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे.

भूम तालुक्यातील धनगर समाजाचे प्रबळ नेते तथा दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे उमेदवार म्हणून सुरेश कांबळे यांची ओळख आहे. माजी आमदार राहुल मोटे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची गेल्या 10 वर्षांपूर्वी ओळख होती. मात्र, त्यांनी विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा त्या निवडणुकीत विजय झाला होता, तर राष्ट्रवादीचे मोटे यांचा पराभव झाला होता. 

आगामी काळात भूम नगरपालिकेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर कांबळे यांचा प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी लाभदायी ठरणार आहे. सध्या भूम शहरात राष्ट्रवादीकडे तेवढासा ताकदवान नेता नाही. भूम तालुक्यात त्यांचा मोठा जनाधर असून दूध संकलन व खवा उत्पादनाच्या माध्यमातून कांबळे यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे परंडा, भूम, वाशी या तीन तालुक्यांत त्यांनी प्रस्थ निर्माण केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com