भगीरथ भालकेंचा पराभव या कारणांमुळे झाला : राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षांचा गौप्यस्फोट

आम्हाला दोषी धरणार असाल तर ते योग्य नाही.
NCP's former Taluka president gives reason of Bhagirath Bhalke's defeat
NCP's former Taluka president gives reason of Bhagirath Bhalke's defeat

पंढरपूर : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला, तो अतिशय दुर्दैवी आहे. विठ्ठल आणि चंद्रभागा सहकार साखर कारखान्याकडे थकलेली शेतकऱ्याची उसाची बिले, कामगारांचे थकीत पगार आणि ज्या कामगारांना मागच्या वर्षी तुरुंगात घातलं गेलं, या सर्व गोष्टींचा पोटनिवडणुकीत आपल्याला फटका बसला आहे. त्यातूनच भालके यांचा पराभव झाला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी केला आहे. (NCP's former Taluka president gives reason of Bhagirath Bhalke's defeat) 

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच बैठक झाली. त्यात चंद्रभागा कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी ‘आपल्याच पक्षाचे पदाधिकारी आमची मापं काढतात,’ अशी तक्रार वरिष्ठ नेत्यांसमोर केली होती. त्यांच्या तक्रारीचा समाचार घेताना पवार यांनी वरील गौप्यस्फोट केला. 

माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार म्हणाले की, पंढरपुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकीसंदर्भात चर्चा व्हायला हवी होती. मात्र, पक्षाची बैठक असताना चर्चा मात्र आमच्यावर झाली. त्यामुळे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे, असे आमचे मत आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवावर चर्चा होत असताना तुमचा पराभव आणि अपयश झाकून नेण्यासाठी तुम्ही आम्हाला दोषी धरणार असाल तर ते योग्य नाही. पोटनिवडणुकीतील अपयशाचे खापर कोणी आमच्यावर फोडू नये. चुका काढायच्याच असतील, तर त्यांनी स्वतः पासून सुरुवात करावी, असे आमचे त्यांना आवाहन आहे.

कल्याणराव काळे यांनी ‘राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परिचारकरांवर टीका करण्याऐवजी आमचीच मापं काढतात,’ असे म्हटले होते. त्याबाबत बोलताना दीपक पवार म्हणाले की, विरोधकांवर टीका करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. ज्या संस्था आमच्या बापजाद्यांनी उभ्या केल्या आणि ज्या संस्थांचे आम्ही सभासद आहोत, ज्या संस्थेला आमचा ऊस जातो, ज्या संस्थांकडे आमची उसाची बिले थकली आहेत. त्याच संस्थांवर आम्ही बोलणार. ज्या संस्थांचे आम्ही कधी तोंडही पाहिले नाही, त्या संस्थांवर बोलण्याची आम्हाला गरजच नाही. तुम्हाला विरोधकांची बरोबरच करायची असेल तर त्यांच्या उसदराबाबत करा. त्यावेळी आम्हीही तुमचे स्वागत करू. आम्ही तुमची मापं वगैरे काही काढत नाही, तुम्ही चांगलं काम केलं तर आम्ही तुमची स्तुतीदेखील करू, असेही पवार यांनी म्हटले आहे. 

कल्याण काळेंमुळे राष्ट्रवादीत गटतट 

सगळ्या पक्षात हिंडून आलेल्या कल्याणराव काळे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा काय असते, हे शिकवू नये. काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 
आल्यापासूनच पंढरपुरातील राष्ट्रवादीला घरघर लागली आहे. तुमच्या कारखान्याकडे थकीत असलेली उसाची बिलं द्या, तुमच्यावर कोणीही नजर ठेवणार नाही की कोणी तुमची मापं काढणार नाही. असे सांगत तुमच्या पाय गुणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटतट पडले आहेत. आमचे नेते शरद पवारांच्या विचारांवर चालणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षाच्या विचारांशी आम्ही आजही बांधील आहोत. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या पक्षात फिरून आलेल्या काळे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा आणि तत्वे शिकवण्याची गरज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com