राऊत - पाटील यांच्यात शाब्दिक वाॅर ! ते कोल्हापूर सोडून कोथरूडला आले, आम्ही काही बोललो का?

जय मुंबईत शिवसेनेची ताकद असेल, तर संजय राऊत यांनी येणारी मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊत यांनी निवडणूक लढवून दाखवावी, मराठीतील म्हणीप्रमाणे दंड थोपटले, संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंड चेक करावेत.
Raut and patil.jpg
Raut and patil.jpg

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक वाॅर सुरू झाले आहे. संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, या चंद्रकांतदादा पाटील यांच्या आव्हानाला राऊत यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले आहे. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?  असा शाब्दिक वार त्यांनी केला. (Verbal war between Raut and Patil! He left Kolhapur and came to Kothrud, did we say anything?)

जय मुंबईत शिवसेनेची ताकद असेल, तर संजय राऊत यांनी येणारी मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊत यांनी निवडणूक लढवून दाखवावी, मराठीतील म्हणीप्रमाणे दंड थोपटले, संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंड चेक करावेत. आपली क्षमताही पहावे असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी यांनी काल केले होते. त्यावर राऊत यांनी उत्तर दिले.

राऊत म्हणाले, की तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का. मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे, त्यांनी त्यांचं पहावं, माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे, असे म्हणत राऊत यांनी चंद्रकांत दादांना डिवचले. अशाही परिस्थितीत पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली, तिकडे मी असणारच. ती जबाबदारी चोखपणे पार पाडणार असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

हेही वाचा..

मनसेकडून मदत

शेवगाव : कोकणात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत व दरड कोसळल्यामुळे झालेल्या वित्त व जीवीत हानीत महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार शेवगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली. त्यांनी अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य व खादय पदार्थांचे संकलन करुन ते चिपळून येथे नागरीकांना पोहच केले.

कोकण हा महाराष्ट्राचाच एक निसर्ग संपन्न भाग असून अतिवृष्टी व पुरामुळे तेथील नागरीकांवर गुजरलेल्या वाईट प्रसंगामध्ये राज्यातील नागरीकांनी मदत म्हणून उभे राहणे गरजेचे आहे. या हेतूने राज ठाकरे यांनी राज्यातील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण व जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर व मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका मनसेच्या वतीने 350 पिण्याच्या पाण्याचे बाँक्स, 200 ब्लँकेट, 100 बिस्कीट बाँक्स, 3 क्विंटल तांदूळ, 3 क्विंटल ज्वारी यासह अत्यावश्यक साहित्य जमा करण्यात आले. त्यासाठी शहरातील हाँटेल व्यावसायिक संघटना, रोटरीचा इनरव्हील क्लब यांनीही मदतीचा हात पुढे केला. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या उपस्थितीत मदतीच्या वाहनांचे पुजन करुन चिपळून येथे रवाना करण्यात आले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com