अरविंद सावंतांनी भाजपची मदत न घेता मुंबईतून खासदार होऊन दाखवावं

पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे.
Arvind Sawant should become an MP without the help of BJP : patil
Arvind Sawant should become an MP without the help of BJP : patil

अकोला : भारतीय जनता पक्षाची मदत न घेता मुंबईतून खासदार होऊन दाखवा. मग कळेल भाजपची काय ताकद आहे, असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना दिले. (Arvind Sawant should become an MP without the help of BJP)

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले पाटील यांनी आज दुपारी अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सावंत यांना आव्हान दिले. पाटील म्हणाले की, पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्याचे एकमेव उत्तर आहे की पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे. मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकट्याच्या जिवावर सत्ता आणा. यापुढे भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर प्रामाणिक राहिलेले रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य या सहयोगी पक्षाच्या मदतीने संघटन वाढवेल. आम्ही आमच्या एकट्याच्या जिवावर सरकार आणून दाखवू. 

मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांत आम्हाला सत्तेवर येण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज लागत नाही. त्यामुळे यापुढे विश्वासघात पुरे. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे काय होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आणि ना. स. फरांदे यांनी शिवसेनेला हाताला धरून आणलं आणि जागांचं वाटप केलं. शिवसेनेच्या लोकांना विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणले आणि आता त्यांचे (शिवसेना) खासदार अरविंद सावंत म्हणतात की, चंद्रकांतदादाचं डोकं खराब झालंय. कधी म्हणताहेत सरकार न आल्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय. हे सगळं जणू डॉक्टरचं आहेत, असा टोला पाटील यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.

राज्यात सत्ता नाही म्हणून चिंता करत बसण्यापेक्षा भाजपने केंद्रात आणि राज्यात काय केले आहे, हे जनतेपर्यंत पोचविले पाहिजे. राज्य सरकार काय करत नाही, हेही लोकांपर्यंत पोचविले पाहिजे. रोज एकतरी निवेदन सरकारला गेले पाहिजे. दर आठवडा-दहा दिवसांनी आंदोलन, धरणे धरा आणि या राज्य सरकारला सळो की पळो करून सोडा, असे आवाहनही पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले.

आमदार पाटील म्हणाले की, शिवसेनेसोबतच्‍या युतीबाबतचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युतीचा कोणताही विचार नाही. सध्या तरी आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहे. कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही. ही जागा लढायची की नाही, ही द्विधा मनःस्थिती संपवून त्यातून कार्यकर्त्यांना बाहेर काढायचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com