शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचे रोखठोक उत्तर

भाजप आणि सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना ठाकरेंकडून पूर्णविराम
uddhav thackray
uddhav thackray

मुंबई : राज्यात शिवेसना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर हा प्रश्न अधुनमधून विचारला जात असतो. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच काही राजकीय घडामोडी होणार असल्याचा अंदाज होता. त्यात भाजपचे 12 आमदार विधानसभेतून निलंबित झाले. या साऱ्या परिस्थितीत थेट मुख्यमंत्र्यांनाच शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र येणार का, हा प्रश्न विचारण्यात आला. त्या मुख्यमंत्र्यांनी रोखठोक उत्तर दिले. (CM Uddhav Thackeray clarifies about Sena-BJP alliance in future) 

विधीमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.  यावेळी ठाकरे यांना भाजपशी पुन्हा मैत्री होण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की मी बाळासाहेब आणि अजित पवार यांच्यामध्ये बसलो आहे. सांगा आता यांना सोडू कुठे जाणार? ठाकरे यांनीच असा प्रतिसवाल विचारल्याने एकच हशा पिकला. त्यानंतर पत्रकारांनाही तोच प्रश्न परत विचारल्यानंतर अहो, तीस वर्षांची युती असताना काही घडले नाही. आता काय घडणार, असा प्रश्न विचारत ही युती होणार नसल्याचे स्पष्ट केले.

विधानसभेत जे काल घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणार आहे. विधानसभेतील विरोधकांचे वर्तन शिसारी यावे असे होते, अशी टीका ठाकरे यांनी केली.  राजदंड पळविण्याचा प्रकार झाला. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचे त्यांनी मला सांगितल्याचे ठाकरे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. 

मी पहिल्यांदा विधीमंडळात आलो आहे. उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार आपण देतो. पण हल्ली जे काही चाललेलं आहे त्याने विधीमंडळाचा दर्जा खालावला आहे. लोकप्रतिनिधींकडून जनतेची अपेक्षा असते. लोकांना चांगले बदल अपेक्षित असतात. पण जबाबदार विरोधी पक्षाकडून वेडेवाकडे वर्तन घडले. असे वागण सभागृहात अपेक्षित नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत ते म्हणाले की जेव्हा परिस्थिती थोडी आटोक्यात येईल असं वाटेल तेव्हा निवडणूक घेऊ, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com