अर्धपुतळा बसवावा, तसे मुख्यमंत्री सभागृहात बसले होते.. - The Chief Minister was sitting in the hall as if a half statue should be installed. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

अर्धपुतळा बसवावा, तसे मुख्यमंत्री सभागृहात बसले होते..

जगदीश पानसरे
मंगळवार, 6 जुलै 2021

विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती होत नाही म्हणून आमच्या बारा सदस्यांना निलंबित केले गेले. सभागृहातील गोंधळाचे कारण पुढे करत ही कारवाई केली गेली.

औरंगाबाद ः विधीमंडळाच्या सभागृहात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष जेव्हा निर्माण होतो, तेव्हा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः उभे राहून परिस्थिती हाताळली पाहिजे. दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत करून सभागृहाचे काम कसे पुढे सुरू राहील, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. (The Chief Minister was sitting in the hall as if a half statue should be installed.) पण आमचे मुख्यमंत्री जागेवरून हललेच नाही. एखादा अर्धकृती पुतळा ठेवलेला असावा, तसे मुख्यमंत्री शांत बसलेले होते, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या दालनात काल त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून भाजपच्या १२ आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या निषेधार्थ काल विरोधी पक्षाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.  (Bjp Leader Haribhau Bagde)आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देशील विधीमंडळ सभागृहाच्या प्रेवशद्वारावरच अभिरूप विधानसभा भरवून भाजपने जनतेचे प्रश्न मांडले.

लोकशाहीतील हा काळा दिवस असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक आमदारांनी या अभिरूप विधानसभेच्या कामकाजात भाग घेत आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. (Assembley Session Mumbai) विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी देखील यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

बागडे म्हणाले, विधीमंडळाचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधकांना विश्वासात घेऊन समन्वयाने चालवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून यांची जबाबदारी असते. भाजपचे सरकार असतांना सभागृहात जेव्हा असा प्रसंग यायचा तेव्हा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः उभे राहून दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत करायचे आणि कामकाज सुरळीत चालायचे.

आताच्या मुख्यमंत्र्यांकडून काल हीच अपेक्षा होती, पण ते शांत बसून राहिले. त्यांनी विरोधकांवर होत असलेला अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहिला. एखादा अर्धपुतळा सभागृहात ठेवावा, तसे मुख्यमंत्री बसलेले होते ही दुर्दैवाची बाब आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतांना सभागृहात  सत्ताधारी पक्षाकडून कुणी सदस्य बोलत असेल तर अजित पवार, जयंत पाटील उभे राहाययचे, अडथळा आणायचे.

तीन पक्षातील वादाचा राग काढला का?

पण विधानसभा अध्यक्ष म्हणून आम्ही दोन्ही बाजूच्या सदस्यांना बोलायची संधी द्यायचो, अनेकदा तर विरोधकांना तास तास बोलण्याची संधी दिली. पण त्या उलट आता विरोधकांची मुस्काटदाबी करून कामकाज रेटून नेण्याचा प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असल्याचे पहायला मिळाले. विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती होत नाही म्हणून आमच्या बारा सदस्यांना निलंबित केले गेले. सभागृहातील गोंधळाचे कारण पुढे करत ही कारवाई केली गेली.

पण आतापर्यंतच्या अधिवेशनाचे कामकाज तपासा, कितीवेळा आमदारांचे निलंबन झाले, किती कालावधीसाठी झाले. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय. त्यांच्या दालनात काय झाले? मला माहित नाही, पण सगळीकडे सीसीटीव्ही आहेत, त्याचे फुटेज तपासा, असे आवाहन देखील बागडे यांनी केले.

विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासंदर्भात सत्ताधारी पक्षांमध्ये एकमत नाही, एक पक्ष निवडणुक घ्यायची म्हणतो, तर इतर त्याला विरोध करतात. आपापसांमध्ये असलेले भांडण आणि राग यातून भाजपच्या बारा  आमदारांना निलंबित करण्याची कारवाई केली गेली, असा आरोपही बागडे यांनी केला.

हे ही वाचा ः केंद्राने कोरोना लसीसाठी एकच आॅर्डर काढावी, कंपन्यांची नफेखोरी नको..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख