भाजपचे मोठे मासे राष्ट्रवादीच्या गळाला; लवकरच पक्षप्रवेश

नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकजण पक्ष प्रवेशासाठी धडपडत आहेत.
Major BJP workers from Shirala will join NCP
Major BJP workers from Shirala will join NCP

शिराळा : शिराळा शहराचे सत्ता केंद्र असलेल्या नगरपंचायतमध्ये आगामी निवडणुकीत आपणाला स्थान मिळावे; म्हणून इच्छुकांनी आत्तापासूनच प्रभागनिहाय मोर्चेबांधणी केली आहे. आपले स्थान मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावून पक्ष प्रवेशाचा शिराळ्याबरोबर तालुक्यातील अनेक गावांत धडाका सुरू केला आहे. अनेक मोठे मासे गळाला लागले असून त्यांचे पक्षप्रवेश बाकी असल्याने या राष्ट्रवादीच्या इनकमिंगची चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. (Major BJP workers from Shirala will join NCP)

राजकारण म्हटलं की कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे सगळीकडे असतात. त्यातून आपले विचार नेत्यांना पटत नसल्याने किंवा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होत नसल्याच्या नाराजीतून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला जातो. निवडणुकीच्या तोंडावर तेच अथवा त्या बदल्यात दुसरे नवीन कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील, यासाठी नेत्यांची सतत धडपड सुरू असते. 

काहीवेळा आपल्यातून बाहेर गेलेल्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून पुन्हा आपल्या पक्षात आणण्यासाठी पक्ष प्रवेशाचे नाट्य सुरू होते. तो कार्यकर्ता किती प्रबळ आहे यावर त्याच्या पक्ष प्रवेशाचे गणित ठरते. अशा नाराज कार्यकर्त्यांना त्यांची नाराजी दूर करून आपल्यात पुनः सामील करून घेण्यासाठी नेत्यांनी स्वतंत्र जबाबदारी आपल्या त्या त्या परिसरातील कार्यकर्त्यांवर सोपवलेली असते. 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकजण पक्ष प्रवेशासाठी धडपडत आहेत. शिराळा नगरपंचायतवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने हे वर्चस्व कायम राखण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक आपापल्या प्रभागात जास्तीत जास्त निधी कसा खर्च करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. 

आगामी निवडणुकीत सत्ता काबीज करायची, या इराद्याने आपापल्या प्रभागात जास्तीत जास्त निधी खेचून कसा आणता येईल, यासाठी विरोधी नगरसेवक धडपडत आहेत. या कामाच्या जोरावर आपणाला आपल्या प्रभागातून पुनः उमेदवारी मिळाली पाहिजे, यासाठी प्रभागचा विकासासाठी लक्ष केंद्रित करत आहेत. तर आपल्या प्रभागातून नेत्यांनी नवीन चेहऱ्याना संधी द्यावी, या हेतूने युवा वर्ग नेत्यांना आपल्या कार्यपद्धतीने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेतेमंडळीही काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांचा शोध घेत आहेत, त्यामुळे किती नवीन चेहऱ्याना संधी मिळणार, हे निवडणूकीच्या रणधुमाळीत समजेल. तो पर्यंत इच्छुकांचे मिशन नगरपंचायत सुरूच राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com