सोलापुरात काँग्रेसचा 'वन मॅन शो' म्हणजे सुशीलकुमार शिंदे! 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सारखे पक्ष देशाचे विभाजन करण्यासाठी उभे टाकले.
Praniti Shinde, Sushilkumar Shinde .jpg
Praniti Shinde, Sushilkumar Shinde .jpg

सोलापूर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे पक्ष देशाचे विभाजन करण्यासाठी उभे टाकले आहेत. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे 'वन मॅन शो' आहेत, असे काँग्रेसच्या (Congress) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी म्हटले आहे. (MLA Praniti Shinde criticizes BJP) 

प्रणिती शिंदे या बुधवारी इलियास शेख यांच्या 'काँग्रेस संपर्क कार्यालया'च्या उदघाटनाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, येत्या 15 ऑगस्टला संपूर्ण देश आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सारखे पक्ष देशाचे विभाजन करण्यासाठी उभे टाकले, असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. "जेंव्हा भाजप पक्ष नव्हता तेंव्हा वंचित आणि एमआयएम ही नव्हते, मात्र, जेंव्हा भाजप मैदानात उतरते तेंव्हा त्यांना मदत करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत असतात, असा आरोप शिंदे यांनी केला. 

जेंव्हा सामान्य माणसाला गरज असते तेंव्हा यापैकी कोणीच नसते आणि जेंव्हा निवडणुका येतात तेंव्हाच हे पक्ष गरीब मतदारांचा उपयोगी करून घेण्यासाठी येतात, असेही त्या म्हणाल्या. पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या, "आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कांही नेते मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना पहायला मिळतं आहेत. अशांचा ना कोणी बॉस आहे, नाही यांना निधी मिळतो. मात्र, सोलापुरात काँग्रेसचा एकच 'वन मॅन शो' आहे, तो म्हणजे सुशीलकुमार शिंदे", असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी अंगावर पाडल्यानंतर आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रणिती शिंदे या मागच्या कांही दिवसांपासून विरोधकांवर जोरदार टीका करताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे सोलापुरातील राजकारण आत्तापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com