काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नेमले चार सल्लागार; माजी आयएएस खासदारासह माजी आयपीएसचा समावेश

पंजाबमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची नुकतीच निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी स्वत:चेच चार सल्लागार नेमले आहेत.
punjab congress president navjot singh sidhu appoints 4 advisers
punjab congress president navjot singh sidhu appoints 4 advisers

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांची नुकतीच निवड करण्यात आली. यानंतर सिद्धू यांनी स्वत:चे चार सल्लागार नेमण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यात माजी आयएएस अधिकारी असलेले खासदार, माजी आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच सर्वांत आधी या नियुक्त्या केल्या आहेत. सिद्धू यांनी म्हटले आहे की, पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना सल्ला देण्यासाठी चार सल्लागारांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पंजाबी नागरिकाच्या कल्याणासाठी हे सर्व जण काम करतील. ते आपापल्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आहेत. त्यांचा नक्कीच जनतेला आणि पक्षाला फायदा होईल. 

या सल्लागारांमध्ये माजी आयएएस अधिकारी व खासदार अमरसिंग, माजी आयपीएस अधिकारी महम्मद मुस्तफा, आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते प्यारेलाल गर्ग आणि राजकीय विश्लेषण मलविंदरसिंग मली यांच्या समावेश आहे. खासदार अमरसिंग हे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी होते. ते फतेहगड साहिब मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. 

महम्मद मुस्तफा हे कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांचे पती आहेत. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पोलीस महासंचालकपदी दिनकर गुप्ता यांची नियुक्ती 2019 मध्ये केली होती. त्यावेळी सेवाज्येष्ठता डावलल्याचा मुद्दा उपस्थित करीत मुस्तफा यांनी या नियुक्तीला आव्हान दिले होते. यामुळे सिद्धू यांनी त्यांची सल्लागारपदी नियुक्ती केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

सिद्धू यांची नुकतीच पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  त्यांच्याबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यासोबत एकदिलाने काम करण्याचे जाहीर केले होते. परंतु, दिवसेंदिवस त्यांच्यातील संबंध बिघडत चालले आहेत. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com