नाराज वसुंधरा राजेंनी मौन सोडलं अन् दिला भाजप नेतृत्वाला थेट इशारा

राजस्थान भाजपमधील अंतर्गत कलह आता टोकाला पोचला आहे. यावरुन वसुंधरा राजेंनी थेट पक्ष नेतृत्वाला इशारा दिला आहे.
vasundhara raje says she does not believe in poster politics
vasundhara raje says she does not believe in poster politics

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेसचे (Congress) सरकार कोसळण्याची वाट पाहत असलेल्या भाजपमधील (BJP) अंतर्गत कलह आता टोकाला गेला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) भाजपच्या पोस्टरवरुन गायब झाल्या आहेत. मागील 20 वर्षांत प्रथमच भाजपच्या पोस्टरमध्ये राजे नाहीत. यावर अखेर राजेंनी मौन सोडून पक्ष नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. 

वसुंधरा राजे यांनी आज त्यांच्या झालावर मतदारसंघातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पोस्टर प्रकरणी मौन सोडलं. त्यांनी पक्ष नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, मला पोस्टरमध्ये दिसण्यापेक्षा लोकांच्या हृदयावर राज्य करायचे  आहे. माझे काम जनतेच्या स्मरणात राहायला हवे. पोस्टरमध्ये दिसून मला काही साध्य होणार नाही. जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्यापेक्षा माझ्यासाठी काहीही महत्वाचे नाही. 

राजे यांनी निवडणूक जिंकून मुख्यमंत्री बनल्या त्यावेळी त्यांच्या पहिल्या जयपूर दौऱ्यावेळी त्यांची मोठी पोस्टर सगळीकडे झळकत होती. ही पोस्टर तातडीने काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्याचीही आठवण राजेंनी करुन दिली. त्या म्हणाल्या की, पोस्टरच्या राजकारणावर माझा विश्वास नाही. मला लोकांच्या मनात राहायचे आहे. त्यांनी माझी आठवण काढावी, असे मला वाटते. लोक माझी आठवण काढतात हेच माझ्यासाठी त्यांचे आशीर्वाद आहेत. मागील 30 वर्षांत मी हेच कमावले आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांकडून त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात वसुंधरा राजे यांच्याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी लायक कोणताही नेता नाही, त्याच एकमात्र सर्वश्रेष्ठ नेत्या आहेत, अशी वक्तव्ये त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहेत. त्यामुळं पक्षात दोन गट पडले आहेत. याचाच फटका अखेर त्यांना बसल्याचे मानले जात आहे. 

वसुंधरा राजे याच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील असे वक्तव्य केल्याबद्दल त्यांचे निकटवर्ती व भाजपचे ज्येष्ठ नेते रोहिताश्व शर्मा यांच्यासह सहा जणांना प्रदेश कार्यालयाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये प्रदेश महामंत्री भजनलाल, प्रताप सिंह सिंघवी यांचाही समावेश आहे. राज्यात पहिल्यांदाच वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना अशाप्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती. दिल्लीतूनच तसे आदेश आले असून या नेत्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com