बैलगाडा शर्यत रोखण्यासाठी नऊ गावांत संचारबंदी; पडळकरांवर पोलिसांचा ‘वाॅच’

आमदार पडळकर यांनी त्याला आक्षेप घेतला.
Curfew imposed in nine villages in the Zare area to prevent bullock cart races
Curfew imposed in nine villages in the Zare area to prevent bullock cart races

झरे (जि. सांगली) : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यती घेण्याचा चंग बांधला आहे, तर दुसरीकडे त्या थांबवण्यासाठी प्रशासानाने कंबर कसली आहे. शर्यती आयोजित करण्यात येणाऱ्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. गावात तणावाचे वातावरण आहे. (Curfew imposed in nine villages in the Zare area to prevent bullock cart races)

दरम्यान,  बैलगाडा शर्यतींचे आयोजन रोखण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. उद्या कदाचित आमदार गोपीचंद पडळकर यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पडळकर यांनी शुक्रवारी (ता. २० ऑगस्ट) बैलांच्या छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारी केली आहे. पारेकरवाडी रस्त्यावर शर्यतीसाठी मैदान बनवले आहे. कोणत्याही परिस्थितीत शर्यती होणारच, असा ठाम निर्धार आमदार पडळकर यांनी केला आहे. दुसरीकडे पोलिस व महसूल प्रशासन शर्यती रोखण्यासाठी तीन दिवस प्रयत्न करीत आहे. बैठका, चर्चा निष्फळ ठरल्याने मध्यरात्रीपासून झरे, परिसरातील नऊ गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आज दुपारी संपूर्ण जिल्ह्यातून पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. पोलिस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, उपाधीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. झरेला येणारा मुख्य पंढरपूर राज्यमार्ग, निंबवडे फाटा, जांभुळणी रोड, विरळी रोड, विभूतवाडी, तरसवाडी, खरसुंडी, आटपाडी- जांभुळणी रस्त्याची नाकाबंदी केली आहे.

शर्यतीसाठी बनवलेल्या मैदानावर पोलिसांनी जेसीबीने जागोजागी चारी पाडून खोदाई करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांनी त्याला आक्षेप घेतला. शर्यती रोखा, मात्र शेतकऱ्याच्या शेतात खोदाई करण्यास मनाई केली. पूर्ण गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. गावात तणावाचे वातावरण आहे.

कराड-पंढरपूरसह अनेक मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवली

आटपाडी तालुक्यातील झरे येथे बैलगाडी शर्यत रोखण्यासाठी प्रशासनाने नऊ गावांत संचारबंदी लागू केली आहे. तसेच, गुरूवारी (ता. १९ ऑगस्ट) सकाळी सहापासून २० रोजी रात्री बारापर्यंत सहा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. कराड-पंढरपूरकडे जाणारी वाहने कराड, मायणी, विटा, दिघंची मार्गे जातील. तसेच कुक्कडवाड, म्हसवडमार्गेही वाहने पंढरपूरला जातील. पंढरपूर ते कराडकडे जाण्यासाठी दिघंची, आटपाडी, विटा, मायणीमार्गे जातील. झरे ते खरसुंडी वाहने विभूतवाडी, तरसवाडीफाटा, घरनिकीमार्गे जातील, तर येणारी वाहने पिंपरीबुद्रुक तरसवाडीफाटा मार्गे झरेला येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com