राजू शेट्टींसह सर्वपक्षीय नेत्यांचा राज्यमंत्री यड्रावकरांच्या उमेदवारीला विरोध

गणपतराव पाटील यांनी ही निवडणूक लढवावी, यावर एकमत झाले आहे.
All party Leaders including Raju Shetty opposed candidature of Minister of State Yadravkar
All party Leaders including Raju Shetty opposed candidature of Minister of State Yadravkar

शिरोळ (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने शिरोळ तालुक्‍यातील प्रमुख नेतेमंडळींची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी ही निवडणूक लढवावी, यावर एकमत झाले आहे, अशी माहिती शिरोळ तालुका बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली. (All party Leaders including Raju Shetty opposed candidature of Minister of State Yadravkar)

याबाबत माहिती देताना दिलीपराव पाटील म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हासदादा पाटील, गणपतराव पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे तालुका नेते अनिलराव यादव, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, राष्ट्रवादी कॉंगेसचे चंगेजखान पठाण, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिवसेनेचे मधुकर पाटील, माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे आदी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बॅंकेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय झाला. शिरोळ तालुक्यातून गणपतराव पाटील यांनी ही निवडणूक लढवावी, असा सूर सर्वांनी लावला. 

दरम्यान, विद्यमान संचालक तथा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेतेमंडळींनी या बैठकीत विरोध दर्शवला.   यड्रावकरांऐवजी गणपतराव पाटील यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी सर्वांनी केली. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यड्रावकरांना तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना सोमवारी शिरोळ तालुक्यातील शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यावेळी शिरोळ तालुक्‍यातून गणपतराव पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही दिलीपराव पाटील यांनी या वेळी दिली.

शिरोळ तालुक्यातून कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधित्व सध्या हे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर करत आहेत. बॅंकेचे विद्यमान संचालक यड्रावकर विरोधक सर्व नेतेमंडळी या बैठकीस उपस्थित होते. सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याकरीता शिरोळ तालुक्‍यातून उमेदवारी बदलावी, असा सूर बैठकीत होता. सर्वच नेतेमंडळींनी यड्रावकरांच्या ऐवजी गणपतराव पाटील यांचे नाव बैठकीत पुढे केले आहे, त्यामुळे शिरोळ तालुक्‍यातून कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत, यड्रावकरांना विरोध होण्याचे संकेत बैठकीमुळे स्पष्ट झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com