काँग्रेसही देणार धक्का; पंजाबचे नवे 'कॅप्टन' सुखजिंदरसिंग रंधवा?

माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, प्रतापसिंग बाजवा, अंबिका सोनी आणि राजकुमार वेर्का यांच्या नावांची जोरदार चर्चा होती.
AICC has proposed name of Sukhjinder Randhawa for Punjab CM
AICC has proposed name of Sukhjinder Randhawa for Punjab CM

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हटवण्यात आले आहे. नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने शनिवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांचे नाव आघाडीवर असल्याची सुरूवातीला चर्चा होती. पण गुजरातमध्ये भाजपने धक्का दिल्याप्रमाणेच पंजाबमध्ये काँग्रेसही धक्का देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (AICC has proposed name of Sukhjinder Randhawa for Punjab CM)

अमरिंदरसिंग यांच्या जागी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, प्रतापसिंग बाजवा, अंबिका सोनी आणि राजकुमार वेर्का यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. पण आता अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

पंजाब काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आमदार सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस केली आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दिल्लीत बैठक सुरू आहे. त्यामुळं रंधवा यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा केली जाऊ शकते. पुढील काही वेळात काँग्रेसकडून रंधवा यांचे नाव अधिकृतपणे जाहीर होईल, असे सुत्रांनी सांगितले. 

जाखड, सिध्दू यांच्या नावाला विरोध 

सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी जाखड यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. ते सध्या आमदार नाहीत. त्यांनी तीनवेळा अबोहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंजाब विधानसभेत ते 2012-2017 या काळात विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2017 मध्ये ते गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण जाखड यांच्या नावाला आमदारांनी विरोध केल्याचं समजतं.

सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध आहे. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत होते. तसेच प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड केल्यानं त्यांचं नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com