अमरिंदरसिंग देऊ शकतात काँग्रेसला झटका? बड्या नेत्याच्या ट्विटनं चर्चेला उधाण

अमरिंदरसिंग यांनी शनिवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.
Ashok Gehlot said Amarinder Singh wont take step to damage to Congress
Ashok Gehlot said Amarinder Singh wont take step to damage to Congress

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना राजीनामा दिला आहे.राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला होता. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अमरिंदरसिंग यांच्याकडून वेगळा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. (Ashok Gehlot said Amarinder Singh wont take step to damage to Congress)

अमरिंदरसिंग यांनी शनिवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. यानंतर बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सकाळी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन, असं अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केलं होतं.

अमरिंदरसिंग प्रचंड नाराज असल्याची चर्चा असून ते वेगळा विचार करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांच मन वळवण्यासाठी धावून आले आहेत. त्यांनी ट्विट करून अमरिंदरसिंग हे काँग्रेसला नुकसान होईल, असं पाऊल उचलणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे. पक्षानं त्यांना साडे नऊ वर्ष मुख्यमंत्री केलं, असे अमिरिंदरसिंगही मान्य करतात. त्यांना आपल्या सर्वोच्च क्षमतेनुसार काम करत पंजाबच्या जनतेची सेवा केली आहे, असे गेहलोत यांनी म्हटलं आहे.

हायकमांडला अनेकदा आमदार आणि जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादावर आधारित पक्षाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांची नाराजी ओढवून घेत काँग्रेस अध्यक्ष मुख्यमंत्र्यांची नवड करतात. पण तेच मुख्यमंत्री बदलताना हायकमांडच्या निर्णयाविरोधात नाराज होत चुकीचे ठरवू लागतात, असा टोला गेहलोत यांनी नाराज असलेल्यांना लगावला आहे. 

देश फॅसिस्ट शक्तींमुळं कोणत्या दिशेनं जात आहे, हा देशवासियांच्या चिंतेचा विषय हवा. त्यामुळे अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची देशहितासाठी जबाबदारी वाढते. स्वत:पेक्षा पक्ष आणि देश हिताचा विचार करायला हवा, असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. कॅप्टन साहेब पक्षातील सन्मानित नेते आहेत. ते पक्षाचे हित लक्षात घेऊनचं पुढेही काम करत राहतील, अशी अपेक्षा असल्याचं गेहलोत यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची बढती मिळताच पुन्हा आमदारांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या. परंतु, काँग्रेस हाय कमांडने अमरिंदर हेच राज्यात कॅप्टन असतील, हे स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता. पण पुन्हा एकदा सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com