आमदार हितेंद्र ठाकूरांचा शिवसेनेला दे धक्का !

पाटील यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणे पक्षाला धक्कादायक आहे.
Shiv Sena's Geeta Gurunath Patil joins Bahujan Vikas Aghadi
Shiv Sena's Geeta Gurunath Patil joins Bahujan Vikas Aghadi

विरार : पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक पक्षांतर घडू लागली आहेत. या निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पूर्वेकडील पारोळ ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. (Shiv Sena's Geeta Gurunath Patil joins Bahujan Vikas Aghadi)

गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर आणि शिवसेनेतील वर्चस्वाची लढाई तीव्र होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी ठाकूर यांच्या महाविद्यालयात येऊन ठाकूर यांची भेट घेतली होती. तसेच, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या पाहता पूर्व पट्ट्यातील गीता पाटील यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणे पक्षाला धक्कादायक आहे.

वसई पंचायत समितीच्या दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक होत असून या दोन्ही जागा पूर्व पट्टयातील असून दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे हा शिवसेनेला बसलेला मोठा धक्का समजला जात आहे. येथील शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील यांच्या समवेत गुरुनाथ गजानन पाटील, सोनू पाटील यांनीही बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात झाला. या वेळी वसई विरार महानगरपालिकेचे माजी सभापती कन्हैया भोईर, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, बहुजन विकास आघाडीचे बाळू घरत, कृपेश पाटील,अशोक पाटील, भिणारचे माजी उपसरपंच रुपेश पाटील, मयूर कुडु, विशाल पाटील, वैभव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com