सहकार तज्ज्ञ समजणाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हक्क आपल्याच कारखान्यात डावलले  

त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.
Minister of State Dattatreya Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil
Minister of State Dattatreya Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil

नीरा नरसिंहपूर (जि. पुणे) : स्वतःला देशाचे सहकाराचे तज्ज्ञ म्हणवणाऱ्यांनी आपल्या दोन्ही   कारखान्यांत सर्वसामान्य शेतकरी, कामगारांना हक्कापासून वंचित ठेवले. शेतकरी सभासदांच्या उसाला भाव व कामगारांना वेळेवर वेतन देणाऱ्यांनाच सहकाराचे तज्ज्ञ म्हणून घेण्याचा अधिकार आहे, अशी घणाघाती टीका राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता केली. (Minister of State Dattatreya Bharane criticizes former Minister Harshvardhan Patil)
 
इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेचे स्थलांतर तसेच पिंपरी बुद्रूक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला ७० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष, सचिव यांचा सत्कार व विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यात राज्यमंत्री भरणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात होते. 

राज्यमंत्री भरणे म्हणाले, माळेगाव व छत्रपती कारखान्यावर शेतकऱ्यांना सध्या अर्जावर सभासद केले जाते, याला सहकार म्हणतात. इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या एकाही रस्त्याचे काम आगामी काळात शिल्लक राहणार नाही. त्यासाठी आठशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे रस्तेही बांधकाम खात्याच्या माध्यमातून करण्यात येतील. विरोधकांकडे वीस वर्ष मंत्रिपद असताना स्वतःच्या भागातील रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही, त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. 

इंदापूर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून एकही वाडीवस्ती यातून वंचित राहणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून मी इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय नागरिकांचे काम करू शकलो नाही किंवा प्रश्न सोडवू शकलो नाही तर मला मंत्री पदावर बसण्याचा अधिकार व लायकी नाही. मी काम करतो म्हणून माझ्यावर विरोधक टीका करतात; परंतु त्यांना कामच नाही. त्यामुळे त्यांना परड्या भरण्याच्या आमंत्रणावर जाण्याची वेळ आली आहे, अशी टीका भरणे यांनी पाटील यांचे नाव न घेता केली. 

राजकारणाचे जोडे बाजूला ठेवल्यानेच पुणे जिल्हा बँकेची प्रगती राज्यात व देशात अव्वल क्रमांकाची झाली आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्यामुळेच झाली असून त्यांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही, असेही भरणे यांनी सांगितले. 

बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद मालक असून त्यांच्या जीवावर अकरा हजार पाचशे कोटींच्या ठेवी व तेवढेच कर्ज वाटप केले असल्यामुळे बँक देशात अव्वल क्रमांकावर आहे. बँकेने सचिवांची केडर स्थापन करून पन्नास कोटींची ठेव बँकेत करण्याचा देशातील बहुधा एकमेव प्रयोग असून लाभांशाच्या रूपाने एक ते दीड लाख रुपये प्रतिवर्षी सचिवांना दिले जातात. पिंपरी बुद्रुकला एटीएम सेंटर तातडीने बसवण्यात येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com