मला आता जगायचे नाही; माझा शेवट जेलमध्येच करा : मनोहरमामाचा उद्‌वेग

ज्या लोकांना मी ओळखतही नाही, अशा लोकांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली आहे.
Manohar Mama Bhosale remanded in police custody for five days
Manohar Mama Bhosale remanded in police custody for five days

माळेगाव (जि. पुणे) : कॅन्सर बरा करतो; म्हणून अडीच लाख उकळल्याप्रकरणी बारामती पोलिसांच्या कोठडीत असलेला भोंदू मनोहरमामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा प्रचंड तणावाखाली गेला आहे. ‘मी बदनाम झालो आहे....मला जेलमधून सोडू नका...माझा शेवट आता जेलमध्येच करा...मला जगायचे नाही...अशा पद्धतीने उद्‌वेगाची भाषा भोसले हा अटकेनंतर बोलत आहे. तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबतची माहिती दिली. (Manohar Mama Bhosale remanded in police custody for five days)

मनोहर भोसले याने गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेणे, फिर्यादीकडून उकळलेले अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उर्वरित दोन आरोपींना अटक करणे बाकी आहे, असे पोलिसांचे म्हणणे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. जे. गिरे यांनी मान्य करत मनोहर भोसले याला पाच दिवसांची (गुरुवारपर्यंत ता. १६) पोलिस कोठडी दिल्याचे अधिकारी ढवाण यांनी सांगितले. सरकारी पक्षाची बाजू अॅड. सुरेश सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली, तर आरोपी भोसले याच्या वतीने अॅड. विजय ठोंबरे यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, आपण बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत बारामतीमधील एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड-कॅन्सर बरा करतो, असे सांगून मनोहरमामा भोसले याच्यासह तिघांनी रुग्णाच्या कुटुंबीयांची दोन लाख ५१ हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) यांनी ता. ९ सप्टेंबर रोजी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती पोलिस ठाण्यात मनोहर मामा भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. 

बारामतीसह अनेक ठिकाणच्या गुन्ह्यात आवश्यक असलेला संशयित आरोपी मनोहरमामा भोसले याला पोलिसांनी लोणंद (जि. सातारा) येथील एका फार्म हाऊसवर शुक्रवारी (ता. १० सप्टेंबर) मोठ्या शिताफीने पकडले होते. अटक आरोपी मनोहरमामा वगळता उर्वरित विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे या आरोपी अद्याप फरारी आहेत, त्यांच्या मागावर पोलिस आहेत. 

पोलिस कोठडीत असलेला संशयित आरोपी मनोहरमामा भोसले ‘सरकारनामा`शी बोलताना म्हणाला, की ज्या लोकांना मी ओळखतही नाही, अशा लोकांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली आहे. अनपेक्षित घटनांना मला सामोरे जावे लागत आहे. याचे मला वाईट वाटत आहे, असे सांगून आपल्यावर झालेल्या आरोपांचे त्याने खंडन केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com