दानवे लोकसभा निवडणूक आली की पाया पडतात, नंतर लाथा मारतात..

मी तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांच्या रथावर देखील चढलो होतो. पण ईश्वर, अल्लाला हे मंजुर नव्हते.
Minsiter Abdul Sattar-Raosaheb Danve news Aurangabad
Minsiter Abdul Sattar-Raosaheb Danve news Aurangabad

औरंगाबाद ः रावसाहेब दानवे यांचे राजकारण घातक आहे, काम असेल तेव्हा ते गोड बोलतात, हात जोडतात, पायाही पडतात. पण काम निघाले की लाथा मारतात, अशा शब्दात महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली. Danve lays the foundation when the Lok Sabha election comes, then kicks.)

औरंगाबाद जिल्हा परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. काॅंग्रेसमध्ये असतांना पक्षाने जालना व औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मी सांगितलेले उमेदवार दिले असते, (Minister Abdul Sattar, Maharashtra) तर आज वेगळे चित्र दिसले असते, असा दावा देखील सत्तार यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे उद्धाटन सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Central State Minister Raosaheb Danve) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि सत्तार यांच्यातील मैत्री संबंध सर्वश्रुत आहे. परंतु राजकीय व्यासपीठावर हे दोघे एकमेकांवर हल्ला देखील चढवतात.

शिवसेनेने राबवलेल्या संपर्क मोहिमे अतंर्गत गाव तिथे शिवसेना शाखा स्थापन करण्यात आल्या. सिल्लोड तालुक्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. यावर दानवे यांनी या शिवसेनेच्या नाही तर सत्तार यांच्या शाखा असल्याची टीका केली होती.

रावसाहबे दानवे यांच्या संदर्भात छेडले असता, सत्तार म्हणाले, रावसाहेब दानवे यांचे राजकारण विचित्र आहे. ते बोलतात एक आणि करतात तिसरेच. त्यांच्या या स्वभाव आणि राजकारणामुळेच त्यांना चकवा म्हटले जाते.

लोकसभा निवडणुक असली की ते पाया पडतात, निवडूक झाली, आपले काम निघून गेले की मग लाथा मारतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. भोकरदन ही माझी आणि सिल्लोड त्यांची सासुरवाडी असल्यामुळे आम्ही दोघे एकाच पक्षात नाही हे बरे झाले.

मी तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांच्या रथावर देखील चढलो होतो. पण ईश्वर, अल्लाला हे मंजुर नव्हते. तेव्हा माझ्या बुद्धीने मला सांगतिले आणि मी शिवसेनेत प्रवेश केला.

काॅंग्रेस न संपणारा पक्ष..

माझा तो निर्णय योग्य होता, म्हणून मी आज सत्तेत आणि मंत्री आहे. नाही तर राधाकृष्ण विखे पाटलांसारखे मलाही विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून घोषणा द्याव्या लागल्या असता, असा टोला देखील सत्तार यांनी लगावला. काॅंग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. अनेकदा हा पक्ष संकटात आला, पण पुन्हा उभारी घेऊन भक्कमपणे पायावार उभा राहिला आहे.

काॅंग्रेस कधीही न संपणारा पक्ष आहे. मी काॅंग्ेसमध्ये काम केलेले आहे, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जालना आणि लोकसभा मतदारसंघात मी सांगितलेले उमेदवार दिले असते, तर आज या जिल्ह्यातील चित्र वेगळे दिसले असते, याचा पुनरुच्चार देखील सत्तार यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com