टोलनाक्यावर तुम्हाला अडवतात...? मग आपल्या राज्यमंत्र्यांचं नाव सांगा ना! 

बांधकाम खातं त्यांच्याकडंच आहे. काहीही अडचण नाही.
If you are stopped at the toll plaza, Say the name of the Minister of State
If you are stopped at the toll plaza, Say the name of the Minister of State

पुणे : टोलनाक्याचा पास देण्याची मागणी पत्रकारांनी केलेली आहे. त्यावर तुमचे आयकार्ड दाखवल्यावर तुम्हाला कोण अडवणार आहे, असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. त्यावर खालून पत्रकारांनी ‘अडवलं जातंय,’ असे सांगितल्यावर पाटील पुन्हा म्हणाले की, ‘तुम्हाला अडवत असतील, तर मग आपल्या राज्यमंत्र्यांचं नाव सांगा ना. बांधकाम खातं त्यांच्याकडंच आहे. काहीही अडचण नाही,’ असे म्हणत पत्रकारांना टोलमधून सवलत देण्याचा मुद्दा राज्यमंत्री भरणे यांच्या कोर्टात टोलवला. (If you are stopped at the toll plaza, Say the name of the Minister of State)

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या डॉक्टर व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात हर्षवर्धन पाटील बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजी रंगली होती. 

पाटील म्हणाले की, ‘काही पत्रकारांचे प्रश्न आहेत. सरकारचे मंत्री येथे उपस्थित असल्यामुळे ते बघतील, त्या प्रश्नांचे काय ते. सध्या आम्ही विश्रांती घेतोय, त्यामुळे काम त्यांनी बघावं. (त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.) सरकारदरबारी जे प्रश्न असतील, ते सरकार म्हणून त्यांनी निश्चित सोडवावेत. त्यांना काही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही दिल्लीतून काही आणू. त्यामुळे पत्रकारांनी चिंता करू नये. पत्रकारांचं काही अडत नाही. पत्रकारांवरील हल्लाविरोधातील विधेयक मी संसदीय कार्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्रकारितेला कायद्याचे रक्षण देण्याचे कामसुद्धा त्याकाळी केले आहे. पत्रकारांचा विमासुद्धा उतरविण्याचे काम केलेले आहे.  

भरणे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साधे व सरळ आहेत. राज्याला पहिल्यांदा असे मुख्यमंत्री मिळाले आहेत. पत्रकारांच्या अडचणींसंदर्भात लवकरच मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेला दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. पत्रकारांनीदेखील जीव धोक्यात घालून काम केलेले आहे. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय स्पर्धा टोकाची आहे. मात्र, मतभेद विसरून भरणे व पाटील इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर एकत्र आल्यामुळे तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचवल्या होत्या. दोघांनी कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावल्याचा चर्चा तालुक्यात सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com