युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला; शिवसेना जिल्हाप्रमुख वानकर पितापुत्रांसह सात जणांवर गुन्हा 

माझ्या शब्दाला वरिष्ठ पातळीवर मान वाढत आहे. या द्वेषातून त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
 Attacks on district chiefs of Yuva Sena in Solapur; Filed charges against seven people
 Attacks on district chiefs of Yuva Sena in Solapur; Filed charges against seven people

सोलापूर : युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, त्यांचे बंधू दत्तात्रय वानकर, वडील प्रकाश वानकर यांच्यासह इतर चारजणांविरूध्द फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, काळजेंनी प्रसिध्दीसाठी बनाव केला असून पोलिस तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ते स्वत:हून पोलिसांत हजर होणार आहेत. (Attacks on district chiefs of Yuva Sena in Solapur; Filed charges against seven people)

काळजे यांच्या फिर्यादीनुसार, युवा सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून माझ्याकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन्ही तालुक्‍यांची जबाबदारी आहे. शिवसेनेत माझी प्रतिमा दिवसेंदिवस चांगली होत असून कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली आहे. माझ्या शब्दाला वरिष्ठ पातळीवर मान वाढत आहे. या द्वेषातून त्यांनी देगाव रोडवरील इंद्रधनू अपार्टमेंटसमोर माझ्यावर हल्ला केला. 

देगाव येथील शेतातून चारचाकी वाहनातून (एमएच 23, डी 808) घराकडे येताना आरोपींनी गाडीला ओव्हरटेक करून त्यांचे वाहन आडवे लावले. प्रकाश वानकर यांनी गाडीतून खाली उतरण्यास सांगून शिवीगाळ केली. त्यांनी काचेवर जोरात हात मारला. खाली उतरल्यावर मनगट धरून तोंडावर चापट मारली. दत्तात्रय वानकर यांनी गाडीचे लॉक काढून गाडीतून उतरून पळून जाताना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पिस्टलसारखे शस्त्र उलटे करून तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत काळजी यांनी नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी

युवा सेनेचे पदाधिकारी मनिष काळजे यांच्यावर इंद्रधनू अपार्टमेंटसमोर हल्ला झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार संशयित आरोपींचा तपास केला जाईल. परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे, त्यांचे मोबाइल टॉवर लोकेशनची पडताळणी केली जाणार आहे, असे तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी सांगितले. दरम्यान, पारदर्शक तपासातून पोलिसांनी वस्तूस्थिती समोर आणावी, अशी मागणी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्‍तांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com