तालिबान काश्मीरमध्ये करणार ढवळाढवळ; नेत्याचं मोठं वक्तव्य

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यानं काश्मीरबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे.
तालिबान काश्मीरमध्ये करणार ढवळाढवळ; नेत्याचं मोठं वक्तव्य
We have right to raise voice of muslims in kashmir says Taliban

काबूल : तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर काश्मीरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. काश्मीर हा द्विपक्षीय आणि अंतर्गत मुद्दा असल्यानं त्यात दखल देणार नाही, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. पण आता मात्र तालिबान प्रवक्त्यानं मोठं वक्तव्य करत भारताची चिंता वाढवली आहे. (We have right to raise voice of muslims in kashmir says Taliban)

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यानं काश्मीरबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. नुकतेच अल कायदानंही काश्मीरबाबत असंच वक्तव्य केलं होतं. शाहीन म्हणाला, मुस्लिम असल्यानं आम्हाला काश्मीरमधील मुस्लिमांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच अन्य देशातील मुस्लिमांसाठीही हा अधिकार आहे. 

आम्ही मुस्लिमांच्या अधिकारांसाठी आवाज उठवू आणि सांगू की, मुस्लिम तुमचेच नागरीक आहे. तुमच्या कायद्यांनुसार समान अधिकार मिळवण्याचा हक्क त्यांना आहे, असंही शाहीन म्हणाला. पाकिस्तानकडून काश्मीरसाठी तालिबानचा वापर केला जाऊ शकतो, अशी भीती आधीपासूनच व्यक्त केली जात आहे. आता अल कायदा आणि तालिबानच्या अशा वक्तव्यांमुळे काश्मीरबाबत भारताची चिंता वाढली आहे. 

दरम्यान, अमेरिकेच्या (USA) ताब्यातून अफगाणिस्तान (Afghanistan) मुक्त केल्यानंतर आता तालिबान (Taliban) आणि अल कायदा (Al-Qaida) यांनी जगातील मुस्लिमबहुल प्रांतांकडे मोर्चा वळवला आहे. त्यांच्या जागतिक जिहादच्या टार्गेटवर आता काश्मीर प्रथमस्थानी आले आहे. याचवेळी चीनमधील (China) शिनझियांग आणि रशियातील (Russia) चेचेन्या या मुस्लिमबहुल प्रांतांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. चीन आणि रशियाने तालिबानला केलेली मदत हे यामागील कारण आहे. 

चीनमधील शिनझियांग आणि रशियातील चेचेन्या या मुस्लिमबहुल प्रांतांकडे तालिबान, अल कायदा तसेच, इतर दहशतवादी संघटनांनी दुर्लक्ष केले आहे. चेचेन्यामध्ये रशियाने मुस्लिमांवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे इराक आणि सीरियामध्ये लढणारे इसिसचे सर्वाधिक दहशतवादी चेचेन्यामधील होते. चीनकडून शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. परंतु, मागील काही महिन्यांत चीन आणि रशियाने तालिबानला मदत केल्याने या दोन्ही प्रांतांची नावे जिहादमध्ये नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतल्यानंतर चीन आणि रशियाने अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली होती. याचबरोबर या दोन्ही देशांनी तालिबानला पाठिंबा दिला होता. याला पाकिस्तानचाही पाठिंबा आहे. पाकिस्तान हा चीन, रशिया आणि तुर्कस्तानच्या मदतीने भारताच्या विरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न करीत आहे.  

Related Stories

No stories found.