भाजपनं केलेल्या पापाचे परिणाम ओबीसी समाज भोगतोय!

ओबीसी आरक्षण राहावे, ही काँग्रेस पक्षाची आधीपासूनची भूमिका आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
Congress Leader Nana Patole slams BJP over OBC reservation
Congress Leader Nana Patole slams BJP over OBC reservation

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यात मोठं वादळ उठलं आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं भाजपसह सत्ताधारी पक्षांनीही त्याला विरोध केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका बहुतेक पक्षांनी घेतली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Congress Leader Nana Patole slams BJP over OBC reservation)

ओबीसी आरक्षणाबाबत माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षण राहावे, ही काँग्रेस पक्षाची आधीपासूनची भूमिका आहे. हे आरक्षण कुठेही कमी होऊ नये. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये राज्य सरकारनं तातडीनं अध्यादेश काढत ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवावं. मगच निवडणुका घ्याव्यात. इम्पिरिकल डाटा आल्यानंतर काय करायचे, याबाबतचा निर्णय त्यावेळी घेतला जाईल. पण आता आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत.

ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याला भाजपकडून महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले, ज्या भाजपनं ओबीसींचे आरक्षण काढलं. या पापाचे परिणाम ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. भाजपने आरोप करणं म्हणजे ओबीसी समाजाची थट्टा करण्यासारखं आहे. त्यांना आरक्षणाची किती काळजी आहे, हे त्यांच्या कर्तृत्वावरून दिसून आलं आहे. आधी त्यांच्या तोंडातला घास हिसकावून आम्हीच त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचं भाजप दाखवत आहे. पण ओबीसी समाजानं हे ओळखलं असून भाजपा त्यांची जागा हा समाज दाखवेल. 

केंद्र सरकार जातनिहाय जनगणनेसाठी विरोध करताना लोकांनी पाहिले आहे. पुतणा मावशीचं भाजपचं प्रेम पाहिले आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत आम्ही ठामपणे भूमिका मांडू, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये काय निर्णय होणार, याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com