अर्धनग्न अवस्थेत आमदारांचा रेल्वेत फेरफटका अन् प्रवाशांनी शिकवला धडा

पोट बिघडलं असल्यानं स्वच्छतागृहाकडं चाललो होतो, असं कारण त्यांनी दिलं आहे.
MLA was seen roaming in undergarments while travelling in train
MLA was seen roaming in undergarments while travelling in train

नवी दिल्ली : रेल्वेतून अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या आमदारांचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. तेजस राजधानी एक्सप्रेसमध्ये ते या स्थितीत फेरफटका मारताना प्रवाशांनी त्यावर आक्षेप घेत थेट रेल्वे सुरक्षा दलाला बोलावलं. पण त्यानंतही प्रवाशांवरच आगपाखड करणाऱ्या माननीयांना अखेर माघार घेत आपल्या जागेवर जाऊन बसावे लागले. हे आमदार नशेत असल्याची तक्रार प्रवाशांनी पोलिसांत दिली आहे. (MLA was seen roaming in undergarments while travelling in train)

हे आमदार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाचे आहेत. गुरूवारी पटना ते दिल्ली मार्गावर तेजस एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. सायंकाळी सात वाजता ही गाडी पटनाहून रवाना झाली होती. याच गाडीमध्ये मंडल हे त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांसह प्रवास करत होते. त्यानंतर काही वेळातच ते अर्धनग्न अवस्थेत रेल्वेत फिरताना प्रवाशांना दिसून आले होते. 

एका प्रवाशाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मंडल या अशा अवस्थेत पाहिल्यानंतर आक्षेप घेतला. गाडीमध्ये महिलाही आहेत, अशा अवस्थेत फिरून नका, असं सांगितलं. पण त्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारदारालाच दमदाटी करण्यास सुरूवात केली. मंडल यांच्यासह इतर सहकारी नशेत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. 

प्रवाशाने रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) कळवल्यानंतर मंडल यांना त्यांच्या जागेवर नेण्यात आले. त्यानंतर या वादावर पडदा पडला. आरपीएफ ने मंडल यांच्या या अवस्थेवरही आक्षेप घेतला. त्यावेळी मंडल यांना आपली चूक लक्षात आली. याविषयी बोलताना पूर्व-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार म्हणाले, आमदारांची ही कृती योग्य नव्हती. या घटनेनंतर आम्ही तक्रारदार प्रवाशाची जागा बदलली. तसेच आमदारांनाही याबाबत जाणीव करून दिली. 

पोट खराब होतं!

मंडल यांनी आपल्या या कृतीचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांनी आपण अर्धनग्न अवस्थेत असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. पोट बिघडलं असल्यानं स्वच्छतागृहाकडं चाललो होतो, असं कारण त्यांनी दिलं आहे. तसंच आपण कधीही खोटं बोलत नाही, असंही ते म्हणाले, दरम्यान, पक्षानं आमदारांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडे याबाबत खुलासा मागवला जाईल, असं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com