...हा तर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा! चिदंबरम यांचं अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र

द्र सरकारच्या नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाईन (एनएमपी) कार्यक्रमावर काँग्रेसकडून दररोज टीकास्त्र सोडले जात आहे.
P Chidambaram slams govt over National Monetisation Pipeline
P Chidambaram slams govt over National Monetisation Pipeline

मुंबई : केंद्र सरकारच्या नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाईन (एनएमपी) कार्यक्रमावर काँग्रेसकडून दररोज टीकास्त्र सोडले जात आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही शुक्रवारी मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. 'एनएमपी' म्हणजे दिवसाढवळ्या राष्ट्राच्या संपत्तीवर घातलेला दरोडा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (P Chidambaram slams govt over National Monetisation Pipeline)

चिदंबरम यांनी शुक्रवारी मुंबईत केंद्र सरकारच्या या धोरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे धोरण निंदनीय असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, देशातील सरकारी मालकीच्या मालमत्तांचे खासगीकरण करून सीतारमण यांनी दीड लाख कोटी रुपये सरकारला मिळणार असल्याचे सांगितले आहे. पण जर या मालमत्तांमधून सध्या देशाला 1.3 लाख कोटी उत्पन्न मिळत असेल तर खासगीकरणातून केवळ 20 हजार कोटी रुपयेच अधिक मिळतील. 

केवळ एवढ्या फायद्यासाठी मागील 70 वर्षांत उभारलेल्या मालमत्ता विकणार?, असा सवाल चिदंबरम यांनी हे निंदनीय असून दिवसाढवळ्या दरोडा असल्याची टीका केली. सध्याच्या मालमत्तांमधून देशाला उत्पन्न मिळत आहे. अर्थमंत्र्यांनी दीड लाख कोटी मिळतील असं सांगितलं आहे. पण त्यांनी सध्या या मालमत्तांमधून किती उत्पन्न मिळत आहे, हेही स्पष्ट करावं, अशी मागणीही चिदंबरम यांनी केली. 

दरम्यान, एनएमपी कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या मालकीच्या मालमत्यांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी कंपन्यांच्या हातात दिले जाणार आहे. पाच वर्षांत यातून सरकार सहा लाख कोटी रुपये उभारणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. या धोरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. ही मालमत्ता कोणाच्या ताब्यात जाणार, हे स्पष्ट आहे. सरकार त्यांच्या दोन मित्रांसाठी हे करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य करत या धोरणावर टीका केली होती. योग्य आणि अयोग्य मुलांमध्ये फरक असल्याचे सांगत ते म्हणाले होते की, योग्य मुलगा वारसा म्हणून मिळालेल्या संपत्तीत वाढ करतो तर अयोग्य मुलगा ते विकून टाकतो. हाच भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक असल्याचं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com