भ्रष्टाचार प्रकरण शशिकलांची पाठ सोडेना; आयकर विभागाकडून मोठा झटका

ही जागा 20 लाख रुपयांत खरेदी करण्यात आली होती. आता या जागेची किंमत सुमारे 100 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
VK Sasikalas Properties Worth 100 crores Seized
VK Sasikalas Properties Worth 100 crores Seized

नवी दिल्ली : अण्णाद्रमुकच्या माजी महासचिव व दिवंगत जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. जयललिता या मुख्यमंत्री असताना 1991 ते 1996 या कालावधीत घेतलेल्या जमीनीवर आयकर विभागानं जप्ती आणली आहे. या जागेवर त्यांचा प्रशस्त बंगलाही आहे. (VK Sasikalas Properties Worth 100 crores Seized)

शशिकला तामिळनाडूतील पायनूर गावात 24 एकर जागा घेतली होती. त्यावेळी ही जागा 20 लाख रुपयांत खरेदी करण्यात आली होती. आता या जागेची किंमत सुमारे 100 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. आयकर विभागाने या जागेवर त्यावरील बंगला व इतर संपत्तीही जप्त केली आहे. त्यामुळं शशिकला यांना मोठा झटका बसला आहे. 

कर्नाटकच्या विशेष न्यायालयानं 2014 मध्ये या मालमत्तेसह 11 मालमत्तांना बेनामी म्हणून घोषित केलं होतं. शशिकला यांच्यासह त्यांचे नातेवाईक इलावरसी व सुधाकरन आणि जयललिता यांच्या संपत्तीचा यामध्ये समावेश आहे. या आधारे आयकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत 24 एकर जमीन जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. 

शशिकला यांना या मालमत्तेचा वापर करता येईल पण त्यांचा व्यवहार करता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात त्यांनी चार वर्षांची शिक्षा भोगली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्या राज्यात परतल्या आहेत. जयललिता यांच्या निधनांतर 2016 मध्ये त्यांनी पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागणार होती. पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. 

एप्रिल-मे महिन्यात तमिळनाडूत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीद्वारे त्या राजकारणात पुन्हा सक्रीय होतील, अशी चर्चा होती. तसे संकेतही त्यांनी दिले होते. पण ऐनवेळी त्यांनी राजकारणात येणार नसल्याचे जाहीर केलं. अण्णाद्रमुकला राज्यात पुन्हा सत्ता मिळावी, यासाठी राजकारणात येऊन अडथळा ठरणार नाही, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com