चिराग पासवान पोहचले तेजस्वी यादव यांच्या घरी अन् बिहारमध्ये उठलं वादळ

पाटणा येथील राबडी आवास येथे चिराग यांनी तेजस्वी यांची भेट घेतली.
LJP Chief Chirag Paswan met RJD Leader Tejaswi Yadav
LJP Chief Chirag Paswan met RJD Leader Tejaswi Yadav

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवास यांच्या निधनानंतर पक्षात बंडाळी झाली. त्यांचे पुत्र व पत्राचे नेते चिराग पासवान यांच्याकडून आता पक्षात आपलं स्थान पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव व चिराग यांना एकत्र पाहू इच्छितो, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुरूवारी चिराग व तेजस्वी यांची भेट झाल्यानं अवघ्या बिहारमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. (LJP Chief Chirag Paswan met RJD Leader Tejaswi Yadav)

पाटणा येथील राबडी आवास येथे चिराग यांनी तेजस्वी यांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. तसेच तेजस्वी यांनीही या भेटीची माहिती ट्विट करून दिली आहे. रामविलास पासवान यांच्या श्रध्दांजली सभेचे निमंत्रण देण्यासाठी चिराग घरी आल्याचे तेजस्वी यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्यानंतरही या भेटीला मोठं राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. 

चिराग यांचे काका व केंद्रीय मंत्री पशुपति कुमार पारस यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी बंड केले आहे. त्यांनी थेट पक्षावर ताबा मिळवत चिराग यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चिराग यांनी पक्ष आपल्याचा ताब्यात असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी राज्यात आशिर्वाद यात्राही काढली. पक्षातील त्यांचं महत्व कमी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपनं पारस यांना मंत्रीपद दिल्यानं चिराग नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपलाही इशारा दिला आहे. 

राज्याच्या राजकारणात टिकाव धरण्यासाठी त्यांना आता तेजस्वी यादव यांच्याच पक्षाचा आधार आहे. त्यांच्यामध्ये फारशी कटूताही नाही. त्यामुळे चिराग व तेजस्वी एकत्र येण्याच्या चर्चेला सध्या जोर आला आहे. त्यातच दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. दरम्यान, चिराग यांनी श्रध्दांजली सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित केले आहे.

या कार्यक्रमाला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. चिराग यांच्याकडून 10 हजार निमंत्रण कार्ड छापण्यात आली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, लालू प्रसाद यादव हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. चिराग व नीतिश कुमार यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. हा कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी पाटणा येथे होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com