जयललिता यांच्या मृत्यूवरून तमिळनाडूत राजकारण पेटलं

तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकीतील राजकारण आता माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याभोवती फिरू लागले आहे.
Tamilnadu assembly election Jayalalithaas death ignited politics
Tamilnadu assembly election Jayalalithaas death ignited politics

चेन्नई : तमिळनाडूनतील विधानसभा निवडणूकीतील राजकारण आता माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याभोवती फिरू लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अण्णाद्रमुककडून जयललिता यांच्या मृत्यूचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जयललिता यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अण्णाद्रमुकने थेट जयललिता यांच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून डीएमकेला अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. 

त्यावर स्टॅलिन यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी माझ्या विरोधात कोर्टात का जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, जयललिता यांची तब्बेत त्या मुख्यमंत्री असतानाच बिघडली होती. त्याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. माझ्यावरील आरोप खरे असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी कोणत्याही कायदेशीर कारवाईला तयार आहे, असे आव्हान स्टॅलिन यांनी दिले. तसेच सत्तेत आल्यानंतर जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ उकलून काढू, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

दोन्ही पक्षांनी सत्तेत आल्यानंतर जयललिता यांच्या मृत्यूची वेगाने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या आरोप-प्रत्यारोपांवरून तमिळनाडूतील राजकारण चांगलेच तापलं आहे. अण्णाद्रमुखने आपला जाहीरनामा कॉपी केल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला आहे. जाहीरनाम्यामध्ये ते प्रत्येकाला विमान आणि हेलिकॉप्टर देण्याचे आश्वासनही देतील. ते काहीही म्हणू शकतात. कारण ते सत्तेत येणार नाहीत, अशी टीका स्टॅलिन यांनी केली.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने भाजपशी तर द्रमुकने काँग्रेसशी आघाडी केली आहे. डीएमकेने १७३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस व इतर मित्रपक्षांना ६१ जागा सोडल्या आहेत. काँग्रेसच्या वाट्याला २५ जागा आल्या आहेत. तमिळनाडूत एकुण २३४ जागा असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मेला निवडणुकीचा निकाल आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com