Corona Alert : जर्मनी, इटली, स्पेन अन् फ्रान्सने कोरोना लशीचा वापर थांबवला

लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याची भीती या देशांनी व्यक्त केली आहे.
Spain Germany France Italy halt of AstraZeneca COVID19 vaccine
Spain Germany France Italy halt of AstraZeneca COVID19 vaccine

नवी दिल्ली : लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याचे कारण देत जर्मनी, फ्रान्स आणि इटली या बड्या युरोपियन देशांनी अॉक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही लस सुरक्षित असल्याचे सांगूनही त्याविरोधात जात या देशांनी वापर थांबवल्याने युरोपातील लसीकरण मोहिम धक्का बसला आहे.

मागील वर्षभरापासून जगभरात कोरोनाने आतापर्यंत सुमारे २६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अमेरिकेसह अनेक विकसित देशांना मोठा झटका बसला आहे. या महामारीला रोखण्यासाठी लसीकरणाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार भारतासह बहुतेक देशांमध्ये लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. पण काही देशांमध्ये अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या तयार होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर काही देशांनी या लसीचा वापर थांबविला आहे.

जागतिक आरोग्य संघटना, अॅस्ट्राझेनेका यांनी याबाबतीत तपासणी केल्यानंतर स्पष्ट केले आहे की, लस सुरक्षित असून त्यामुळे रक्तात गुठळ्या होत नसल्याचे आढळले आहे. गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप आढळून आलेला नाही. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहिम पुढेही सुरु ठेवणे महत्वाचे आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. 

यापूर्वी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क नॉर्वे या देशांनीही लशीचा वापर थांबवला आहे. त्यानंतर आता जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही सोमवारी लशीचा वापर थांबला. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोवानिया, लातविया या देशांनीही त्याचे अनुकरण केले. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे. 

दरम्यान, भारतामध्ये अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, भारतात या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे भारतातील लसीकरण सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारतात कोव्हॅक्सिन या लसीचा वापरही होत आहे. दोन्ही लसींच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली जात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com