काँग्रेसचे गरिबांसाठी आता 'स्पीक अप'

देशभरात सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाउनचा फटका गरीब, स्थलांतरित, छोटे व्यावसायिक आणि मध्यम वर्गाला बसला आहे. त्यांच्या आवाज सरकारपर्यंत पोचवण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावरील 'स्पीक अप' मोहिमेची घोषणा केली आहे.
Congress will launch speakup campaign to raise voice of poor
Congress will launch speakup campaign to raise voice of poor

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाकडून उद्या (ता.28) सोशल मीडियावर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही मोहिम चालविण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी दिली. लॉकडाउनमुळे हाल सुरू असलेल्या नागरिकांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

माकन म्हणाले की, पक्षाचे  नेते आणि कार्यकर्ते उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत 'स्पीकअप' ही ऑनलाइन मोहीम सोशल मीडियावर चालवतील. देशभरात अडलेल्या सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोचविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. याचबरोबर मनरेगा अंतर्गत त्यांनी 200 दिवसांचा रोजगार देण्यात यावा आणि त्यांनी तातडीने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. तसेच, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे. 

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले की, पक्षाचे सर्व नेते फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातूलन गरीब, स्थलांतरित आणि छोटे व्यावयासिक व व्यापारी यांचा आवाज सरकारपर्यंत पोचवतील. यासाठी पक्षाने छोटी व्हिडीओ मोहीमही राबवली आहे. 

लॉकडाउनमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. सरकार याबाबत पावले उचलत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी बुधवारी दाखल केली. सुरजेवाला यांनी याचिकेत म्हटले आहे की, स्थलांतरित कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत. विशेषतः लॉकडाउनमुळे मूळ राज्यात परत जाऊ न शकणाऱ्या कामगारांसाठी सरकारला पावले उचलण्यास सांगावे. स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नी विरोधी पक्षांचा समावेश असलेली संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे सरकार विरोधी पक्षांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. सुरजेवाला यांनी ही याचिका सुनील फर्नांडिस यांच्यामार्फत दाखल केली आहे. सरकारने तातडीने जिल्हा आणि गाव पातळीवर कामगारांना स्वीकारण्यासाठी सुविधा केंद्रे सुरू करावीत आणि मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यास मदत करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. 

पुणे : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. अन्वय हे रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील स्टुडीओचे डिझायनर होते. अर्णब गोस्वामी यांनी कामाचे पैसे थकविल्याने अर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अन्वय यांची कन्या आज्ञा नाईक यांनी देशमुख यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर देशमुख यांनी सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com