अर्णब गोस्वामी यांची सीआयडी चौकशी करण्याचा गृहमंत्री देशमुखांचा आदेश

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील हे प्रकरण आहे...
arnab goswami
arnab goswami

पुणे : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

अन्वय हे रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील स्टुडीओचे डिझायनर होते. अर्णब गोस्वामी यांनी कामाचे पैसे थकविल्याने अर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अन्वय यांची कन्या आज्ञा नाईक यांनी देशमुख यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर देशमुख यांनी सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत.

गोस्वामी यांच्या रिपब्लिक या टीव्हीच्या मुंबई येथील स्टुडीओचे अन्वय हे डिझायनर होते. या कामातील अर्थिक देणी वसूल न झाल्याने अन्वय यांनी अर्थिक अडचणीतून २०१८ मध्ये अलिबाग येथे आत्महत्या केली. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांच्या कन्या आज्ञा नाईक यांनी केली होती. त्यानुसार देशमुख यांनी आज चौकशीचे आदेश दिले. या चौकशीमुळे गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी पालघर येथे साधूंच्या मॉब लिंचिंग प्रकरणात धार्मिक द्वेष पसरविल्याबद्दल राज्य सरकारने गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची बारा तास चौकशी केली आहे. या प्रकरणाला एक महिना उलटला नाही तोपर्यंत गोस्वामी यांच्याविरोधात ही दुसरी चौकशी लागली आहे.

कॉन्कर्ड डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील स्टुडीओचे काम नाईक करीत होते. या कामाचा पाच कोटी ४० लाख रूपयांच्या व्यवहारातून ताण आल्याने अन्वय यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुरवातीपासून करण्यात येत आहे. मात्र, या आत्महत्येचा आणि व्यवहाराचा संबंध नसल्याची दावा रिपब्लिकच्यावतीने करण्यात आला आहे. अलिबाग पोलिसांनी याबाबत तसे न्यायालयात सांगितले होते. काही हितसंबंधी लोक सुवातीपासून या प्रकरणात आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा गोस्वामी यांच्यावतीने करण्यात येत आहे. यापूर्वीच्या पोलीस तपासातदेखील त्यांनी हीच भूमिका मांडली आहे. या संपूर्ण प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्याशिवाय अन्य दोघांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com