AAP creats history in surat municipal election
AAP creats history in surat municipal election

पंतप्रधान मोदींच्या बालेकिल्यात आपची जोरदार एंट्री

काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली असून सूरत महापालिकेतआपने मुसंडी मारली आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. चार महापालिकांमध्ये भाजपने बहुमत मिळवले असून दोन महापालिकांमध्येही बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली असून सूरत महापालिकेत आपने मुसंडी मारली आहे. 

गुजरातमधील सहा महानगरपालिका भाजपच्याच हाती जाणार असल्याचे मतमोजणीवरून स्पष्ट होत आहे. अहमदाबादसह, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले आहे. सहा महापालिकांमध्ये १४४ वॉर्डमध्ये २२७५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये सहाही महापालिकांत भाजपने आघाडी घेतल्याचे दिसते. सूरत महापालिकेत भाजपला आतापर्यंत ९३ जागा मिळाल्या असून काँग्रेसला खातेही खोलता आले नाही. याठिकाणी आपने धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. आपचे २७ उमेदवार विजयी झाले आहेत. 

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजकोट शङरात भाजपला ७२ पैकी ६८ जागा मिळाल्या असून काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. २०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला ३० जागा अधिक मिळाल्या आहेत. जामनगरमध्येही ६४ पैकी ४० जागा जिंकत भाजपने बहुमत मिळविले. तर काँग्रेसला पाच आणि बीएसपीचे ३ उमेदवार निवडूण आले. वडोदरामध्ये ७६ पैकी ४८ तर भावनगरमध्ये ५२ पैकी ३५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी काँग्रेसला अनुक्रमे ७ व पाच जागा मिळाल्या. 

अहमदाबादमध्ये १९२ जागांपैकी भाजपला ७२ तर काँग्रेसला १२ जागा मिलाल्या आहेत. तसेच एआयएमआयएमने चार जागा जिंकत महापालिका निवडणुकीत खाते खोलले आहे. दरम्यान सुरत महापालिकेत २७ जागा मिळवत आपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपने पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे सुरतमध्ये मिळालेला विजय साजरा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २६ फेब्रुवारीलाला सूरतमध्ये रोड शो करणार करून लोकांचे आभार मानणार असल्याचे समजते. 

सहाही महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही सहाही महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे. पंजामध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा विजय झाला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्याने पंजाबमधील निवडणुकांना महत्व होते. त्यापाठोपाठ गुजरातमध्येही निवडणुका झाल्या. पण शेतकरी आंदोलनाचा कोणताही परिणाम या निवडणुकांवर झाल्याचे दिसत नाही. 

Edited by Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com