मुख्यमंत्री म्हणतात, मास्क लावा अन् मंत्री म्हणतात, हनुमान चालिसा वाचा!

हनुमाल चालिसा वाचल्याने आणि शंख वाजविल्याने प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे एका मंत्र्याने म्हटलं आहे.
Madhya Pradesh Minister Usha Thakur says avoid mask
Madhya Pradesh Minister Usha Thakur says avoid mask

भोपाळ : कोरोना रुग्ण वाढत असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क वापरणे, सहा फूटांचे अंतर आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण मास्क न वापरणाऱ्या एका मंत्र्याने अजब दावा केला आहे. हनुमाल चालिसा वाचल्याने आणि शंख वाजविल्याने प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी हा दावा केला आहे. भोपाळ व इंदौरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. प्रशासनाने पुन्हा निर्बंध वाढविले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन जनतेला केले आहे. पण त्यांचे मंत्रीच मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मंगळवारी अनेक आमदार व मंत्री मास्कशिवाय दाखल झाले. 

उषा ठाकूरही मास्क शिवायच सभागृहात आल्या. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मी हनुमान चालिसा वाचते. दररोज शंख वाजवते. काढा पिते. हवन करते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. कोरोनापासून बचावासाठी मी हे करते. गळ्यात पंचा असतो, कोणी जवळ आल्यास तोंडला लावते, असे ठाकूर यांनी सांगितले. वेदांना दहा हजार वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वोत्तम आयुष्य जगण्यासाठी वैदिक जीवन पध्दतीचा अवलंब करायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

ठाकूर यांच्या अजब दाव्यानंतर दुसऱ्या आमदार रामबाई यांनी मास्क लावणार नसल्याचे जाहीर करून टाकले. ज्यांच्याकडे हिमंत असते, तोच काहीतरी करू शकतो. मास्क न लावल्याने जो दंड होईल, तो मी देईन, पण मास्क लावणार नाही. मला घाबरल्यासारखे होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. इंदौर आणि भोपाळ मध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com