राठोडांना वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर दडलंय काय?

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संजय राठोड यांना वाचवत असल्याचा आरोपआमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
BJP Leader Ashish Shelar criticise CM and Deputy CM over pooja chavan death case
BJP Leader Ashish Shelar criticise CM and Deputy CM over pooja chavan death case

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संजय राठोड यांना वाचवत असल्याचा आरोप भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्यासाठी मोठे कारस्थान केले जात आहे. या मंत्र्याला वाचविण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील केबिनमध्ये काय दडलंय ते समोर यायला हवे, अशी टीकाही त्यांनी केली.

वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर ते पहिल्यांदाच समोर आले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी केलेली वक्तव्य तसेच त्यांच्या समर्थनार्थ झालेल्या गर्दीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. चित्रा वाघ, अतुल भातखळकर यांच्यानंतर आता शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. 

शेलार म्हणाले, आधी पोलिस तपास यंत्रणेवर राजकीय दबाव होता. आता सामाजिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पीडितेच्या कुटूंबियांची वक्तव्ये मानसिक दबावाखाली केल्याचे दिसते. समाजाची ढाल पुढे करून संजय राठोड पुढे येत आहे. अदृश्य असलेले संजय राठोड आज दृश्य झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी अदृश्य स्वरूपात सुरू केलेली चौकशी आता दृश्य स्वरूपात कधी येणार आहे?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. 

आता पर्यंत या चौकशीत किती जणांचे जबाब घेतले हे मांडल पाहीजे. सत्तेत बसलेले लोक साक्षीदारांना पळवत आहे. संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री वाचवत आहे, असा आरोप शेलार यांनी केला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्या कार्यक्रमला परवानगी मिळाली कशी ? याची माहीती गुप्तवार्ता विभागाला कशी मिळाली नाही?, असे प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केले.

दरम्यान, राठोड माध्यमांशी बोलताना म्हणाले, गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडं राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे राठोड यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com