तहसीलदारांना धुवावे लागले चहाचे कप...कारण वाचून बसेल धक्का

होरोगेरी या गावातील अनुसूचित जातीमधील लोकांनाअजूनही अस्पृश्यतेचा सामना करावा लागत आहे.
Karnataka tahasildar washes cups to root out casteism
Karnataka tahasildar washes cups to root out casteism

बेंगलुरू : कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील मुदारंगीचे तहसीलदार टपरीवर चहाचे कप धुवताना दिसून आले. हे पाहून गावकरीही हैराण झाले. पण जेव्हा तहसीलदारांनी वापरलेले चहाचे कप धुवण्यामागचे कारण समजले तेव्हा गावकऱ्यांनाही चपराक बसली. गावातील अनुसूचित जातीमधील लोकांशी होत असलेल्या भेदभावाबद्दल जागृती करण्यासाठी तहसीलदारांना हे करावे लागल्याचे समोर आले आहे. 

अशप्पा पुजार असे या तसहसीलदारांचे नाव आहे. होरोगेरी या गावातील अनुसूचित जातीमधील लोकांना अजूनही अस्पृश्यतेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या घरातील लग्न किंवा अन्य कार्यक्रम असल्यास गावातील दुकानदार दुकाने बंद करतात. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार अशप्पा पुजार यांच्याकडे आली होती. त्याची दखल घेतल पुजार हे तालुक्यातील काही अधिकाऱ्यांसह थेट गावात पोहचले. त्यांच्यासोबत क्षेत्रीय पोलिस निरीक्षक व समाज कल्याण विभागाचे काही अधिकारी होते. 

गावाची लोकसंख्या सुमारे 2300 एवढी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीमधील सुमारे 150 लोक आहेत. पुजार या गावातील एका चहाच्या टपरीवर गेले. तिथे त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी अनुसूचित जातीमधील लोकांसह उच्चवर्णीयांना चहा दिला. त्यानंतर हे चहाचे कप त्यांनी स्वत: धुतले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेली ही कृती सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. 

तहसीलदार चहाचे कप धुवत असल्याचे पाहून गावकरीही हैराण झाले. त्यानंतर पुजार यांनीही दुकानदारांशी चर्चा करून त्यांनी असे करण्यामागचे कारण सांगितले. अस्पृश्यते सारख्या वाईट सामाजिक कृतीला मुळापासून नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. कुणीही वापरलेला चहाचा ग्लास किंवा कोणतेही भांडे धुतले तर काही होत नाही, हेच दाखवून द्यायचे होते, असे पुजार यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना पुजार म्हणाले,  अनुसूचित जातीमधील कुणाचाही मृत्यू झाल्यास गावातील 4 ते 5 चहाची दुकाने बंद केली जातात. तसेच इतर दुकानेही बंद होतात. या तक्रारी आल्यानंतर आम्ही गावात गेलो. अधिकाऱ्यांनी गावातील दोन्ही समाजातील सुमारे 100 लोकांना एकत्रित केले. त्यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. उच्च वर्णीयांनी आम्हाला अनुसूचित जातीमधील लोकांशी कोणताही भेदभाव करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com