मी एक नंबरचा कोब्रा, डसलो तर तुमचा फोटो लागेल! भाजपमध्ये जाताच दिला इशारा - Mithun chakraborty slams trinamool congress after joining bjp | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

मी एक नंबरचा कोब्रा, डसलो तर तुमचा फोटो लागेल! भाजपमध्ये जाताच दिला इशारा

वृत्तसंस्था
रविवार, 7 मार्च 2021

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला.

कोलकता : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 70 वर्षीय अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'मी एक नंबरचा कोब्रा आहे, डसलो तर तुम्ही फोटो बनाल,' असे डायलॉग बोलत मिथून यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटांतील काही डायलॉगही बोलून दाखविले. 

ब्रिगेड मैदानावर मिथून चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच मुंबईतील घरी जाऊन मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथून यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून त्यांनी पक्षप्रवेश केला. 

हेही वाचा : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अश्रू आले कामी; भाजपपेक्षा जास्त जागा मिळवण्यात यश

यावेळी बोलताना मिथून यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, ''मी बंगाली असल्याचा गर्व आहे. मला माहित आहे की, लोकांना माझे डायलॉग आवडतात. माझा नवीन डायलॉग आहे, मी प्युअर कोब्रा आहे. मी डसलो तर तुम्ही फोटो बनाल. आमचा हक्क कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास मी फना काढेन,'' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  भाजपमध्ये प्रवेश करणे हा स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य...म्हणाले, अधिकाऱ्यांना बांबूने मारा

दरम्यान, मिथून चक्रवर्ती यांची राजकीय वाटचाल 2014 मध्ये सुरूच झाली होती. ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये 34 वर्षांचा डाव्या पक्षांचा गड उध्वस्त करत राज्यात तृणमूलची सत्ता आणली. यावेळी बंगालमध्ये ममतादीदींची लोकप्रियता खूप वाढली होती. सत्तेत आल्यानंतर ममतांनी मिथून चक्रवर्ती यांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले. ममतादीदींची लोकप्रियता पाहून मिथून यांनी हे आमंत्रण स्वीकारत राजकारणात प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेचे तिकीटही मिळाले. तृणमूलकडून राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून गेले. पण केवळ अडीच वर्ष ते खासदार राहिले. या अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन दिवस ते संसदेत उपस्थित होते. 

चिटफंड घोटाळ्यात नाव

मिथून चक्रवर्ती यांच्या राजकीय कारकीर्दीला शारदा चिटफंड घोटाळ्याने ब्रेक लावला. 2015-16 मध्ये या घोटाळ्यात मिथून यांचेही नाव आले. त्यामुळे डिसेंबर 2016 मध्ये त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनंतर त्यांनी स्वत:ला राजकारणापासून दुरच ठेवले. मिथून हे शारदा कंपनीचे ब्रँड अॅम्बॅसेडर होते. ईडी ने या घोटाळ्यात त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी 1 कोटी 20 लाख रुपये कंपनीला परतही दिले. या घोटाळ्याचा हिस्सा बनू इच्छित नाही, असे त्यावेळी ते म्हणाले होते.

डाव्या विचारसरणीशी जोडलेले

मिथून चक्रवर्ती यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण डाव्यांची सत्ता असताना त्यांना डाव्यांचे जवळचे मानले जात होते. तत्कालीन क्रीडा मंत्री सुभाष च्रकवर्ती यांच्या ते जवळचे असल्याची चर्चा होती. तरूण असताना त्यांनी आपण डाव्या विचारसरणीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ममतादीदींच्या सोबत गेल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले होते. आता भाजपमध्ये जात त्यांनी पून्हा धक्का दिला आहे.

Edited By Rajanand More 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख