केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य...म्हणाले, अधिकाऱ्यांना बांबूने मारा!

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पुन्हा वादात अडकले आहेत.
Hit officers with a bamboo stick says central minister giriraj singh
Hit officers with a bamboo stick says central minister giriraj singh

बेगूसराय : नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पुन्हा वादात अडकले आहेत. बिहारमधील अधिकाऱ्यांवर टीका करताना त्यांची त्यांची जीभ घसरली. अधिकाऱ्यांनी काम नाही केलं तर त्यांना बांबूने मारा, असे ते लोकांना म्हणाले.

बिहारमधील बेगूसराय हा गिरीराज सिंह यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. ते अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत असतात. काल एका कृषी संस्थेद्वारे बेगूसरायमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गिरीराज सिंह प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना गिरीराज सिंह यांनी अधिकाऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

गिरीराज सिंह म्हणाले, ''अधिकारी नागरिकांच्या समस्या ऐकूनच घेत नसल्याच्या अनेक तक्रारी येतात. मी तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांना म्हणतो की, एवढ्या छोट्या कामांसाठी माझ्याकडे का येता. खासदार, आमदार, सरपंच, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी जनतेची सेवा करायला हवी. हे त्यांचे कर्तव्यच आहे. जर ते तुमेच ऐकत नसतील तर हातात बांबू घेऊन त्यांच्या डोक्यात मारा. यानेही काम होत नसेल तर गिरीराज तुमच्यासोबत आहे.''

गिरीराज सिंहाच्या या भाषणानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. या वक्तव्याविषयी बोलताना भाजपचा एक म्हणाला, ''गिरीराज सिंह हे लोकनेता आहेत. त्यांना लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतात. त्यांचे वक्तव्य आपण शब्दश: घेऊ नये. त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात.''

तेजस्वी यादव भडकले

गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय जनता दलाने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने ट्विट करत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. एकीकडे मुख्यमंत्री युवकांना सरकारी अधिकाऱ्यांना विरोध किंवा आंदोलन केल्यास तुरूंगात टाकू, नोकरी देणार नाही, असे सांगतात. दुसरीकडे गिरीराज सिंह म्हणतात, अधिकाऱ्यांना बांबूने मारा. हे सरकार आहे की महाजंगलराज सुरू आहे?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com