आपण मराठा आहोत; जागेवरच हिशेब चुकता करतो!

त्याबाबत त्यांची उघडपणे नाराजी दिसून आली.
BJP MLA Ravindra Chavan is unhappy about the program in Kalyan Dombivali
BJP MLA Ravindra Chavan is unhappy about the program in Kalyan Dombivali

कल्याण-डोंबिवली : ‘‘मी कुठं चुकणार नाही. माझ्याकडून काही चूक होणार नाही. आपल्याकडून जे झालाय, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण मराठा आहोत. जो काही हिशेब आहे, तो इथल्या इथेच चुकता करतो,’’ असे भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सुनावले. (BJP MLA Ravindra Chavan is unhappy about the program in Kalyan Dombivali) 

कल्याण-डोंबिवली शहरातील कोपर पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार चव्हाण हे आपल्या कार्यकर्त्यांसह घोषणा देत कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. त्या वेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार चव्हाण यांच्या बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. त्याबाबत त्यांची उघडपणे नाराजी दिसून आली. पोलिसांनी आमदार चव्हाण यांना आसनस्थ व्हायला सांगितलं. मात्र ते पहिल्यांदा बसले नाहीत. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला. त्यानंतर मात्र भाषणात मला जे काही बोलायचे आहे, ते बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यानंतर कार्यक्रमात बोलताना मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले की, डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बाबूगिरीचा उद्धव ठाकरेंना प्रचंड राग आहे. लोकांच्या घरची भांडी घासू नका. पण हे सर्व बाबूमंडळी पुन्हा तेच करत आहेत. याचे दुःख आहे. काही अधिकारी कशा पद्धतीने वागत आहेत. पण, आपण तसे वागणार नाही. गाय विसरू मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू नका, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेला केले.

हेही वाचा : किरीट सोमय्या बारामतीतून कोणावर तोफ डागणार?
 
आपण हिंदुत्वाचा धागा पकडून चाललोय. तुमच्या आमच्या मनात असणारे हिंदुत्व कायम आहे. राज्यात कत्तलखानाच्या नूतनीकरणासाठी पैसे दिले जात आहेत. वेदपाठशाळेला निधी मंजूर करूनही पैसे दिले जात नाहीत. डोबिंवली शहराशी आपले नाते आहे. या नात्यासाठी आम्ही आपला आदर करतो, असेही चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीसाठी भरपूर निधी दिला. या शहराशी आपले नाते आहे. या नात्यासाठी आम्ही आपला आदर करतो. एकनाथ शिंदे साहेबांना सांगा. डोंबिवलीवर प्रेम करा. कामे सुरू करा. कल्याणमधील ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनाफोन करून सांगा, कल्याण-शिळ रोड तुकडा तुकडा काम सुरू आहे. ही टीका नाही, तर ही व्यथा आहे. या सर्वांवर तुम्हीच लक्ष ठेवले पाहिजे. पालघर निवडणुकीत आम्ही युतीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला नाही. येथील डीसीपी अन्याय करतात, त्याचा जाब विचारला पाहिजे. युतीचा धर्म पाळला. आमच्या कार्यकर्त्यांना वैर नाही. बाबू अधिकारी अन्याय करतात, अशीही व्यथा भाजप आमदार चव्हाण यांनी मांडली. 

विकास कामांसाठी आम्हाला 472 कोटी रुपये हवे आहेत. रस्ते डीपीआर तयार असेल तर मेट्रो, ग्रोथ सेंटर उभे राहिले पाहिजे. युतीतला कार्यकर्ता म्हणून आमची व्यथा जाणून घ्या. कोरोना काळात प्रत्येकाला कचरा कर लावू नका, सांगितले तरीही लावला. आता 17 कोटी रुपये उपविधीच्या माध्यमातून कर घेतला जातोय. मागणी करूनही अधिकारी ऐकत नाहीत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

कल्याण डोंबिवलीकर आपल्यावर प्रेम करतात. काळा तलाव भगवा करताना झटलो, ती आमची चूक होती का? तुम्ही आमचा न्याय करणार की नाही. न्यायची भूमिका जात-धर्म बघून घेता येत नाही. आम्ही कायम संघर्ष करायचा का? आम्ही अंगावर अजून किती केसेस घ्यायच्या? आपण हे राजकीयदृष्ट्या म्हणत नाहीये. कार्यकर्त्यांची व्यथा आहे, न्याय द्या, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com