शिवसेनेचे शेकापला बालेकिल्ल्यातच जोरदार धक्के!

अलिबागमध्येच म्हणजे बालेकिल्ल्यातच शेकापला धक्का बसला आहे.
Former Panchayat Samiti member of PWP joins Shiv Sena
Former Panchayat Samiti member of PWP joins Shiv Sena

नेरळ : कर्जत तालुक्यातील नांदगाव आणि ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये शेकापच्या माजी पंचायत समिती सदस्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांचे  आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षात स्वागत केले. (Former Panchayat Samiti member of PWP joins Shiv Sena)

दरम्यान, शेकाप नेत्यांच्या अरेरावीला वैतागून पोयनाडच्या माजी सरपंच रेश्मा जोशी यांनी रविवारी (ता. 5 सप्टेंबर) आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे अलिबागमध्येच म्हणजे बालेकिल्ल्यातच शेकापला धक्का बसला आहे.  

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये पंचायत समिती माजी सदस्य चित्रा मनोहर खारोटे, तसेच लहू पुनाजी कारटे, प्रकाश मनोहर अगिवले, ज्ञानदेव वामन दिघे, शब्बीर इस्माईल भातबर्डे, काशिनाथ रामचंद्र झुगरे, जयेश रघुनाथ शिंगोळे, संजय भाऊ कराळे, आशा शंकर जोशी, काळुबाई नामदेव दिघे, साधना विठ्ठल मुंडे, विश्वास बाळू वाडेकर, विठ्ठल भवारी, रोहिणी पुंडलिक जोशी, सचिन लक्ष्मण कानडे, दीपक काळु शिंद, दुर्गेश नामदेव फोपे, अरुण काळुराम कारोटे, अंकुश मारूती चिमटे यांचा समावेश आहे. 

या कार्यकर्त्यांमुळे नांदगाव व ओलमण ग्रामपंचायतमधील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेना संघटनावाढीसाठी यांचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी उत्तम शेळके, विभाग प्रमुख रवी ऐनकर, नागेश साबळे, शत्रुघ्न शिंगोळे तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोयनाडच्या माजी सरपंच नेत्यांच्या अरेरावीला कंटाळल्या

अलिबाग : शेकाप नेत्यांच्या अरेरावीला वैतागून पोयनाड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रेश्मा जोशी यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जोशी यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. 

या पक्षप्रवेशाने पोयनाड ग्राम पंचायतीमधील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आपल्या जनसंपर्काने कुर्डुस विभागात शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे रेश्मा जोशी यांनी पक्षप्रवेश करताना आमदार दळवी यांना आश्वासन दिले. शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघात एकामागून एक शेकापचे कार्यकते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पुढील भव्य पक्षप्रवेश पेझारी नाक्यावर करून शेकापला आणखी एक मोठा धक्का देणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी वक्तव्य केले आहे. 

या वेळी शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख अरविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार शेरमकर, डाॅ.अविनाश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com